Dombivli Viral Video Saam Tv
मुंबई/पुणे

Dombivli : रस्त्यावरच्या खड्ड्यांमध्ये साचलेल्या पाण्यात धुतली केळी, डोंबिवलीत किळसवाणा Video Viral

Dombivli News : डोंबिवलीमधील एका व्हिडीओची सध्या सोशल मीडियावर चर्चा पाहायला मिळत आहे. या व्हिडीओमध्ये दोघेजण रस्त्यावरील खड्ड्यांच्या घाणेरड्या पाण्यात केळी धुत असल्याचे दिसते.

Yash Shirke

अभिजीत देशमुख, साम टीव्ही, प्रतिनिधी

डोंबिवली पश्चिम परिसरात रस्त्याच्या खड्ड्यांमधील घाणीच्या पाण्यात केळी धुऊन त्यांची विक्री केल्याचा किळणवासा प्रकार उघडकीस आला आहे. डोंबिवली पश्चिमेतील गोकुळ बंगल्याजवळील ही धक्कादायक घटना घडली आहे. घाणेरड्या पाण्यामध्ये काहीजण केळी धुत असल्याचे पाहायला मिळाले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवली पश्चिम येथील ठाकरे गटाचे विभाग प्रमुख राजेंद्र सावंत यांनी एक व्हिडीओ शेअर केला. सावंत यांनी रस्त्याच्या घाणेरड्या पाण्यात केळी धुतानाचा व्हिडीओ त्यांच्या मोबाईलफोनमध्ये कैद केला. संबंधित फळ विक्रेत्याला विचारणा केली असता 'माझं नुकसान तुम्ही भरुन देणार का' अशा प्रकारची गुर्मी विक्रेत्याने दाखवली.

डोंबिवलीमध्ये घाणीतल्या पाण्यात फळ धुऊन मग त्यांची विक्री सुरु असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणामुळे डोंबिवलीकरांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. व्हायरल व्हिडीओमधील संबंधित फळ विक्रेत्यावर कारवाई करण्याची सर्वत्र मागणी होत आहे. या एकूणच प्रकरणामुळे डोंबिवलीमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

'गोकुळ बंगल्याशेजारी एक केळी विक्रेता सांडपाण्यामध्ये केळी खाली पडली होती, ती केळी वर ठेवत होता. तेव्हा आम्ही त्याला घाणेरड्या पाण्यातील केळी विकायला काढत आहेस? असा प्रश्न केला. तेव्हा माझं नुकसान झालंय ते तुमचा बाप भरुन देणार का असा प्रतिप्रश्न त्याने आम्हाला केला. केळी पाण्यात पडली होती, त्या घाणेरड्या पाण्यात केळी विसळून घेत होता. त्याचा व्हिडीओ मी काढला आहे', असे वक्तव्य ठाकरे गटाचे विभाग प्रमुख राजेंद्र सावंत यांनी केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शत्रूंपासून सावध राहा, किरकोळ खर्च टाळा; ५ राशींच्या लोकांना मोठ्या संकटाना सामोरे जावे लागणार

Beed Crime: तू माझ्याशी का नाही बोलत? चारित्र्याच्या संशयावरून तरुणीवर जीवघेणा हल्ला; घरात घुसून चाकूने सपासप वार, परळी हादरले

Varanasi : मांस विक्री व्यवसायावर मोठा बदल; टप्प्याटप्प्याने दुकाने शहराबाहेर हलवणार, कुठे आणि का?

Maharashtra News Live Update: राष्ट्र्वादीची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवांरांच्या नेतृत्वाखाली बैठक सुरू

चुकीचा तपास नडला; जिवंत मुलीला मृत ठरवून वडिलांना-भावाला केली होती अटक, दोन पोलीस निरीक्षकांचे निलंबन

SCROLL FOR NEXT