Dombivli Manpada Police Saam Tv
मुंबई/पुणे

Dombivli Crime: दुबईचे चलन ७०० दिरहम देण्याचं दाखवलं आमिष, व्यापाऱ्याला घातला ४ लाखांचा गंडा

Dombivli Manpada Police: डोंबिवलीमध्ये औषध विक्रेत्याला ४ लाखांचा गंडा घालण्यात आला आहे. दुबईचे चलन ७०० दिरहम देण्याचे आमिष दाखवत त्यांची फसवणूक करण्यात आली आहे.

Priya More

अभिजित देशमुख, कल्याण

दुबईचे चलन असलेले ७०० दिरहम देण्याचे आमिष दाखवत दोघांनी व्यापाऱ्याला लाखोंचा गंडा घातल्याची घटना डोंबिवलीमध्ये घडली आहे. याप्रकरणी दोघांना मानपाडा पोलिसांनी अटक केली. डोंबिवलीच्या पलावा परिसरातून आरोपींना पोलिसांनी अटक केली. आरोपींनी आपली नावं बदलून अनेकांना फसवलं. पोलिसांकडून आरोपींची कसून चौकशी सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २ भामट्यांनी डोंबिवलीतील एका औषध विक्रेत्याला तब्बल ४ लाखाचा गंडा घातला. या प्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मानपाडा पोलिसांनी डोंबिवलीजवळील कोणी पलावा परिसरात सापळा रचत दोघांना बेड्या ठोकल्यात. मोहम्मद शेख आणि मोहम्मद चौधरी अशी या दोन्ही आरोपींची नावं आहेत. त्यांचा एक साथीदार पसार झाला असून पोलिस शोध घेत आहेत. हे दोघे नागरिकांना दुबईतील चलन दिरहम देण्याचे आमिष दाखवून त्या मोबदल्यात लाखो रुपये उकळत होते. आपली नाव बदलून ते नागरिकांची फसवणूक करत होते. या दोघांनी आणखी काही जणांची फसवणूक केल्याचा संशय मानपाडा पोलिसांना असून पोलिस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.

डोंबिवली एमआयडीसी परिसरातील एका औषध विक्रेत्याला तीन अनोळखी व्यक्तींनी दुबईचे चलन ७०० दिरहम देतो असे सांगत त्या मोबदल्यात बारा लाख रुपयांची मागणी केली. औषध विक्रेत्याला विश्वास पटल्याने त्याने या तिघांना चार लाख रुपये दिले. या तिघांनी त्याच्या हातात एक बंडल ठेवले आणि पसार झाले. बंडल उघडून पाहताच त्यात कागदाची रद्दी असल्याचे औषध विक्रेत्याच्या लक्षात आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी याप्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात धावे घेत तक्रार दाखल केली.

या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपींचा शोध सुरू केला. या गुन्ह्यातील २ जण खोणी पलावा परिसरातील येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे मानपाडा पोलिसांनी परिसरात सापळा रचला. त्यांना दोन संशयित फिरताना आढळले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली. तर आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी दोघांना देखील बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडून १ लाख ७८ हजार रुपयांची रोख रक्कम, युनायटेड अरब अमीरत सेंट्रल बँकेच्या नावे असलेले शंभर रुपये किमतीचे दिरहम, दोन मोबाईल फोन जप्त केले, त्यांचा एक साथिदार फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Balushahi Recipe: सणासुदीला झटपट बनवा खुसखुशीत आणि पाकात मुरलेली बालूशाही, वाचा रेसिपी

Tomatoes for heart health: हृदयाच्या आरोग्यासाठी टोमॅटो फायदेशीर; पण कच्चा खावा की शिजवून? कार्डिओलॉजिस्टने दिलं उत्तर

Pitru Paksha 2026: श्राद्ध कसं करायचं? पितृ पक्षात कोणते विधी केले जातात? वाचा...

Maharashtra News Live Update: साहिल वाकोडे मृत्यू प्रकरण, चौकशी समितीने आणखी 8 आठवड्यांची मुदत मागितली

मनोज जरांगेंना मोठा झटका! निकटवर्तीयावर ४.९० कोटींचा दंड कायम

SCROLL FOR NEXT