rape case  Saam tv
मुंबई/पुणे

डोंबिवलीतील संतापजनक घटना! १६ वर्षांच्या मुलीवर सामूहिक अत्याचार; आरोपीत २ अल्पवयीन मुलांचा समावेश

Dombivli crime : डोंबिवलीत एक अतिशय धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका अल्पवयीन मुलीवर तिघांनी सामूहिक अत्याचार केल्याची घटना घडल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी तिघांनाही ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू केला आहे.

Namdeo Kumbhar

संघर्ष गांगुर्डे, कल्याण प्रतिनिधी

डोंबिवलीतील मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. गेल्या काही दिवसांपासून घरातून बेपत्ता असलेल्या एका अल्पवयीन मुलीला जाळ्यात ओढून तिच्यावर तिघांनी सामूहिक लैंगिक अत्याचार (Gangrape) केल्याची भयंकर घटना घडली आहे. याप्रकरणी मानपाडा पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत तीनही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये दोन अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुलगी काही दिवसांपासून तिच्या घरातून बेपत्ता होती. या काळात आरोपींनी तिला 'चांगल्या कामाला लावून देतो' असे खोटे आमिष दाखवले. कामाच्या बहाण्याने त्यांनी या मुलीला एका घरात नेले. तेथे तिघांनी मिळून या असहाय्य अल्पवयीन मुलीवर पाशवी अत्याचार केला. या घटनेची माहिती मिळताच मानपाडा पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवून तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे. या गंभीर गुन्ह्याचा पुढील तपास मानपाडा पोलीस करत असून, दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, अशी माहिती डोंबिवलीचे एसीपी सुहास हेमाडे यांनी दिली आहे.

नेमके काय घडले?

डोंबिवली पूर्वेतील मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारी १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी घरातून बेपत्ता झाली होती. वहिनीसोबत (भाऊजाई) वाद झाल्यामुळे ती एका ओळखीच्या व्यक्तीसोबत घरातून निघून गेली होती. बदलापूर-कटाई रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये जेवण घेण्यासाठी ती गेली असता, तिच्याकडे पैसे नव्हते. त्यामुळे हॉटेल चालकाने तिला काहीतरी खायला दिले.

हॉटेलमध्ये काम करणाऱ्या अंगूर सिंह याने मदत करण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीचा विश्वास संपादन केला. त्यानंतर अंगूर सिंहने परिसरातीलच दोन अल्पवयीन तरुणांशी तिची ओळख करून दिली. पीडित मुलीने या तिघांनाही आपण घरातून निघून आलो असल्याचे सांगत आपली व्यथा मांडली. त्यावर या तिघांनी तिला 'कामावर लावून देतो आणि राहायला घरही देतो' असे आमिष दाखवून एका निर्जन ठिकाणी नेले. तेथे या तिघांनीही असहाय्य मुलीवर पाशवी सामूहिक अत्याचार (दुष्कर्म) केले.

पोलिसांनी आरोपींना ठोकल्या बेड्या

या घटनेनंतर आरोपी नराधमांनी मुलीला रस्त्यावरच सोडून दिले. ती मुलगी भटकत कुळगाव-बदलापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोहोचली. तेथे काही सुजाण नागरिकांनी तिला पाहिले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले. मुलीने घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. मुलगी घरातून निघून गेल्यामुळे मानपाडा पोलीस ठाण्यात आधीच अपहरणाचा गुन्हा दाखल होता. त्यामुळे बदलापूर पोलिसांनी तत्काळ याची माहिती मानपाडा पोलिसांना दिली. माहिती मिळताच मानपाडा पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवून तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले.

यातील अंगूर सिंह (वय २२) याला अटक करण्यात आली आहे, तर इतर दोघे अल्पवयीन आहेत. अंगूर सिंहला कल्याण न्यायालयात हजर केले जाणार असून, इतर दोन्ही अल्पवयीन आरोपींना बाल न्यायालयात हजर केले जाईल. मात्र, या धक्कादायक घटनेमुळे पुन्हा एकदा महिला व मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT