Crime News Saam Tv
मुंबई/पुणे

Dombivli Crime : डोंबिवलीत धक्कादायक घटना, 4 वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार; शेजारी राहणाऱ्या ८५ वर्षीय नराधमाला अटक

Dombivli minor girl sexual assault case latest news : डोंबिवलीत लज्जास्पद घटना घडलीय. चार वर्षीय मुलीवर शेजारी राहणाऱ्या ८५ वर्षीय म्हाताऱ्याने अत्याचार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे.

Nandkumar Joshi

डोंबिवलीत संतापजनक घटना

४ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार

शेजारील ८५ वर्षीय आरोपीला अटक

अल्पवयीन मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

संघर्ष गांगुर्डे, डोंबिवली | साम टीव्ही

महिला आणि मुलींवरील अत्याचाराच्या घटनांचे प्रमाण वाढलेले असतानाच, मुंबईजवळच्या डोंबिवलीत अत्यंत संतापजनक घटना घडली आहे. एका चार वर्षीय मुलीवर शेजारी राहणाऱ्या ८५ वर्षीय नराधमाने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ गुन्हा नोंदवून संशयित आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेमुळं मुली आणि महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही संतापजनक घटना घडली. चार वर्षीय बालिकेवर त्यांच्याच शेजारी राहणाऱ्या ८५ वर्षीय व्यक्तीने लैंगिक अत्याचार केला. पीडित बालिकेच्या कुटुंबीयांनी हा आरोप केला आहे. पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून रामनगर पोलिसांनी गुन्हा नोंदवला. संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन तपास सुरू केला आहे.

मुलगी खेळत होती, आरोपीनं घरात नेलं...

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी घरासमोर खेळत होती. त्याचवेळी शेजारी राहणाऱ्या आरोपीने तिला घरात नेले, असा तक्रारीत आरोप करण्यात आला आहे. मुलीसोबत काही तरी विचित्र घडलं आहे, असे काही वेळाने तिच्या आईच्या लक्षात आलं. ती तातडीने मुलीला तेथून बाहेर घेऊन गेली आणि थेट पोलिसांशी संपर्क साधला.

आईच्या तक्रारीनंतर पोलिसांनी नोंदवला गुन्हा

हा धक्कादायक प्रकार लक्षात आल्यानंतर पीडित मुलीची आई तातडीने रामनगर पोलीस ठाण्यात पोहोचली आणि आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. त्याआधारे पोलिसांनी आरोपीविरुद्ध पॉक्सो अंतर्गत गुन्हा नोंदवला आणि संशयित आरोपीला अटक केली.

पोलिसांकडून घटनेचा पुढील तपास सुरू आहे. मुलीची वैद्यकीय तपासणी आणि संबंधित कायदेशीर प्रक्रिया करण्यात पूर्ण करण्यात येत आहे. या प्रकरणातील सर्व बाबींचा तपास करून पुढील कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त होत असून, मुलींच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कळंबा कारागृहात कैद्यांकडून अधिकाऱ्याला मारहाण

Nashik News: मोकाट कुत्र्यांचा हैदोस, ठाकरेसेनेने थेट मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात सोडले कुत्रे; पाहा VIDEO

...तर OBC साठी स्वतंत्र पक्ष काढणार; बड्या नेत्याचा सरकारला इशारा, पडळकरांवरही हल्लाबोल

Kalwa Tourism : येणारा वीकेंड कुटुंबासोबत प्लान करा, फिरा कळव्याजवळचे ५ मस्त मान्सून पिकनिक स्पॉट्स

Manoj Jarange: लाठीचार्ज झाला तर सरकार पडेल, मुंबईतील आंदोलनाबाबत मनोज जरांगेंची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT