A senior citizen was duped in an ATM card swap scam in Dombivli, losing ₹55,000 after a fraudster posed as a bank official. Saam Tv
मुंबई/पुणे

धक्कादायक! मदतीच्या बहाण्याने कार्ड बदललं अन् 55 हजारांचा घोटाळा; नेमकं काय घडलं?

ATM Card Swap Scam In Dombivli Maharashtra: डोंबिवलीत एटीएममध्ये कार्ड बदलून निवृत्त महिला अधिकाऱ्यांची 55 हजारांची फसवणूक झाल्याची घटना घडली आहे.

Omkar Sonawane

संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही

डोंबिवली शहरात एटीएम फसवणुकीचे प्रकार पुन्हा एकदा समोर येत असून, एका निवृत्त महिला अधिकाऱ्याला भामट्यांनी चकवून तब्बल 55 हजार रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. डोंबिवली पूर्वेतील मानपाडा रोड परिसरात राहणाऱ्या छाया देशपांडे या ज्येष्ठ नागरिक मुंबई महानगरपालिका येथील निवृत्त अधिकारी आहेत. नेहमीप्रमाणे त्या पेन्शन काढण्यासाठी इंदिरा चौकाजवळील बँक ऑफ महाराष्ट्र च्या एटीएममध्ये गेल्या होत्या.

यावेळी एटीएममध्ये उपस्थित असलेल्या अज्ञात भामट्याने बँक कर्मचारी असल्याची सांगून मदतीच्या बहाण्याने त्यांना फसवले. कार्ड बदलण्याची चलाखी करत आरोपीने त्यांच्या हातातील मूळ एटीएम कार्ड घेऊन दुसऱ्या बँकेचे कार्ड त्यांच्या हातात दिले. हा प्रकार लक्षात येण्याआधीच आरोपीने त्यांच्या खात्यातून 55 हजार रुपये काढून तेथून पसार झाला. मी नेहमीप्रमाणे पेन्शन काढायला गेले होते. एका व्यक्तीने मदत करण्याच्या बहाण्याने माझे कार्ड बदलले. नंतर मला समजले की माझ्या खात्यातून पैसे काढले गेले आहेत अशी माहिती छाया देशपांडे यांनी दिली आहे

घटनेनंतर छाया देशपांडे यांनी संबंधित बँकेत तसेच पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. एटीएममधील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध घेतला जात आहे.एटीएममध्ये व्यवहार करताना अनोळखी व्यक्तींची मदत घेऊ नये, तसेच आपले कार्ड आणि पिन कोणालाही देऊ नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज्याच्या प्रशासनात 'बदली' वारे! तुकाराम मुंढेंसह 6 बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे झाली बदली?

Eye Glasses Clean Tips: चष्म्यावर स्क्रॅच आलेत? मग या ७ सोप्या ट्रिक्स करा फॉलो, नव्यासारख्या दिसतील काचा

नवी मुंबई विमानतळ नामकरण प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; दि.बा.पाटील यांच्या नावाची याचिका फेटाळली

Maharashtra News Live Update: खडकपूर्णा नदीतून अवैध रेती उत्खनन व वाहतूक बंद करा, नागरिकांनी रोखला जुना मुंबई-पुणे- नागपूर महामार्ग

IAS Tukaram Mundhe : मोठी बातमी! तुकाराम मुंढेंची ४५ दिवसांत पुन्हा बदली; आता कुठे झाली नियुक्ती?

SCROLL FOR NEXT