Nagpur Accident News Saam Tv
मुंबई/पुणे

Accident News: चालकाचे नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात.. आधी महिलेला धडक, नंतर कार थेट दुकानात , १ गंभीर जखमी

Dombivli Accident News: कारने पादचारी रिक्षासह दुकानाला धडक दिली. या अपघातात एक महिला गंभीर जखमी झाली आहे. अपघातातील जखमीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Gangappa Pujari

अभिजीत देशमुख, डोंबिवली

डोंबिवलीमधून हिट अँड रनची धक्कादायक घटना समोर आली आहे. डोंबिवलीच्या खंबाळपाडा परिसरात कारचे नियंत्रण सुटल्याने कारने पादचारी रिक्षासह दुकानाला धडक दिली. या अपघातात एक महिला गंभीर जखमी झाली आहे. अपघातातील जखमीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, डोंबिवली ठाकुर्ली येथे राहणारा प्रथमेश पालांडे त्याचा मित्र विक्रांत उपेले याच्यासह कार घेऊन सायंकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास खंबाळपाडा परिसरात आला.गाडी रस्त्याच्या बाजूला उभी करत प्रथमेश गाडीतून उतरून बाहेर आला त्याने विक्रांतजवळ चावी देत गाडी लॉक करायला सांगितले. विक्रांतने चावी लावून कार चालू केली.

मात्र कार चालवता येत नसल्याने त्याचा तोल सुटला भरधाव वेगाने कारने पादचारी रिक्षासह दुकानाला धडक दिली. या अपघातात एक महिला गंभीर जखमी झाली. कार पलटी झाल्याने पुढील अनर्थ टळला. स्थानिक नागरिकांनी विक्रांतला बाहेर काढत घटनेची माहिती पोलिसांना दिली. टिळकनगर पोलिसांनी तत्काळ घटना स्थळी धाव घेत विक्रांतला ताब्यात घेतलं .या प्रकरणी गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे.

दरम्यान, शनिवारी (ता.५ ऑक्टोबर) अमरावती जिल्ह्यातील शिरजगाव कसबा ते देऊरवाडा वळण मार्गावर दोन टू व्हीलरचा भीषण अपघात झाला. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झालेत. अतिवेगामध्ये आलेल्या टूव्हीलर एकमेकावर आदळल्यानेहा भीषण अपघात झाला. दुर्घटनेनंतर जखमींना अमरावती जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashok Kharat Case: मासा पाण्यातील वनस्पती! शाकाहारी लोकांना खायायला लावले मासे, खरातचा बंडलपणा आला समोर

RBI Rules: रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय! ऑनलाइन पेमेंटच्या नियमात बदल; आजपासून काय काय बदललं?

Summer Hair Care : अगदी कमकुवत केससुद्धा दुप्पट वेगाने वाढतील, फक्त १५ दिवस करा 'हा' उपाय

Maharashtra Live News Update: भोंदू अशोक खरातला १४ दिवसांची न्यायलयीन कोठडी

How to store coriander: फ्रीजमध्ये ठेवली तरी कोथिंबीर काळी पडतेय? या टीप्सचा वापर करून पाहा

SCROLL FOR NEXT