एसटी महाकार्गोचा वापर करत डोंबिवली शिवसेनेतर्फे पूरग्रस्तांना मदत प्रदीप भगणे
मुंबई/पुणे

एसटी महाकार्गोचा वापर करत डोंबिवली शिवसेनेतर्फे पूरग्रस्तांना मदत

डोंबिवली शिवसेना आणि मा. नगरसेवक विश्वनाथ राणे यांनी पूरग्रस्तांना मदत करण्याकरिता एस. टी. महाकार्गोचा वापर केला आहे.

प्रदीप भणगे

डोंबिवली - महाड, चिपळूण, कोल्हापूरमध्ये मोठा पूर आला आणि अनेकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यातून पूरग्रस्तांना (flood victims) मदत केली जात आहे. मात्र डोंबिवली शिवसेना (shivsena dombivali) आणि मा. नगरसेवक विश्वनाथ राणे यांनी पूरग्रस्तांना मदत करण्याकरिता एस. टी. महाकार्गोचा (mahacargo) वापर केला. डोंबिवली शिवसेनेतर्फे पूरग्रस्तांना मदत पाठवण्यात आली आहे. यासाठी १८ वाहन भरून अन्नधान्यासह पिण्याचे पाणी, कपडे आणि इतर साहित्य घेऊन डोंबिवली शिवसेनेचे पदाधिकारी पूरग्रस्त भागासाठी डोंबिवली मधून रवाना झाले आहेत. मात्र १८ वाहनांमध्ये आकर्षक ठरली ती एस. टी. महामंडळाची महाकार्गो 'बस'. या पूर्वी एसटीची महाकोर्गो बस कोणीही बघितली नसल्याने याची डोंबिवलीत चर्चा सुरू झाली आहे. (Dombivali ShivSena helps flood victims using ST MahaCargo)

हे देखील पहा -

या बाबत मा. नगरसेवक विश्वनाथ राणे यांनी सांगितले की, एस. टी. हे महाराष्ट्रातील सर्वात जूने ट्रान्सपोर्ट आहे. एस. टी.ची विश्वासार्ता आहे, विशेष करून आम्हा कोकणी लोकांना. कारण आम्हाला येण्या - जाण्याचं माध्यमच एसटी होतं आणि तिच्यावर प्रेम आजही आमचं आहे. आज रेल्वे जरी झाली असली तरी आम्ही एसटीने प्रवास करतो. जर एसटीने एवढी ट्रान्सपोर्ट सिस्टीम तयार केली आहे मालवाहतुक, जेव्हा मी महाकार्गो विषयी विचारलं तर भाडेही कमी आहे आणि रस्त्यामध्ये त्याला कुठेही आडकाठी होत नाही. शिवाय महाकोर्गो मधून एका वेळेस दहा टन माल वाहतूक होते.

पूरग्रस्तांसाठी मदतीचा ओघ ठिकठिकाणी सुरू असला तरी अशा संकट समयी शिवसेना कधीच मागे नसते असे शिवसेना शहरप्रमुख राजेश मोरे यांनी सांगितले. कर्तव्याला जागून कल्याण लोकसभेचे खा. डॉ. श्रीकांत शिंदे, डोंबिवली शिवसेना शहर शाखा आणि डोंबिवली शिवसेना शहरप्रमुख राजेश गोवर्धन मोरे यांच्या वतीने खारीचा वाटा म्हणून १० हजार पूरग्रस्त कुटुंबांसाठी जीवनावश्यक वस्तूंचे जसे - तांदूळ, गव्हाचे पीठ, मीठ, साखर, चहापत्ती, तूरडाळ, बिस्किटे, फरसान, दूध पावडर, गोडेतेल, टूथपेस्ट, चादर, टॉवेल, ब्लँकेट, बेडशीट, चटाई, खाकरा, पिण्याचे पाणी बॉटल्स, साडी, कपडे, साबण, हॅन्डवॉश, गरम मसाल्याचे पदार्थ, सॅनेटरीन नॅपकिन, गाऊन, लुंगी, अंतर्वस्त्रे, बॅटरी आणि चार्जर  इत्यादी या सर्व वस्तूंचे एक किट बनवून त्यांचे वाटप महाड, खेड, चिपळूण आणि पश्चिम महाराष्ट्र येथील पूरग्रस्त भागात करण्यात येणार आहे. ही मदत घेवून डोंबिवली शिवसेना शहर शाखेवरून कार्यकर्ते रवाना झाले. यावेळी जिल्हाअध्यक्ष गोपाळ लांडगे, माजी महापौर विनिता राणे, माजी नगरसेवक दीपेश म्हात्रे आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Local Body Election : आचारसंहिता लागू झाल्यानंतर कोणत्या गोष्टींवर लागणार निर्बंध? जाणून घ्या

Horoscope 6 November: या राशींसाठी आजचा दिवस असेल खास, तुमची रास कोणती?

Maharashtra Live News Update: - विमानाचं लँडिंग करताना विमनाच्या पंखात अडकला पतंगाचा मांजा

Suraj Chavan Wife : बिग बॉस किंग सूरज चव्हाणची बायको कोण? नावही आहे खास

Maharashtra Politics: कोकणात मोठी राजकीय घडामोड, भाजपकडून ठाकरेसेना अन् शिंदेसेनेला धक्का; बड्या नेत्यांनी हाती घेतलं 'कमळ'

SCROLL FOR NEXT