Youth Save 2 years Old Boy Life Saam Tv
मुंबई/पुणे

Dombivali News: काळ आला होता, पण देवदूत धावला; चिमुकला इमारतीवरुन पडला, 35 वर्षांचा तरूणाने कॅच केला|Video Viral

Youth Save 2 years Old Boy Life: 2 वर्षांचा चिमुकला इमारतीवरुन पडतानाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. एका ३५ वर्षाच्या मुलाने इमारतीवरून खाली पडलेल्या मुलाला वाचवलंय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भरत मोहळकर, साम प्रतिनिधी

आता एका देवदूताची बातमी. दोन वर्षांचा चिमुकला इमारतीवरून पडला. या चिमुकल्याचा कपाळमोक्षच होणार तोवर एक 35 वर्षांचा तरूण देवदूत बनून तिथ काही क्षणात दाखल झाला. हृदयाचा थरकाप उडवणार हा थरारक प्रकार कसा घडला त्यावरचा हा विशेष रिपोर्ट. डोंबिवलीच्या देवचीपाडा येथील 2 वर्षांचा चिमुकला इमारतीवरुन पडतानाचा हा व्हिडीओ पाहून तुम्हाला धडकी भरल्याशिवाय राहणार नाही.

इमारतीच्या 3 ऱ्या मजल्यावरुन 2 वर्षांचा सात्विक देसले पडला. त्याला पडताना पाहताच भावेश म्हात्रे वायूवेगाने चिमुकल्याच्या दिशेने धावला . भावेशने चिमुकल्याला हातात झेलण्याचा प्रयत्न केला. चिमुकला आधी भावेशच्या हातावर आणि त्यानंतर भावेशच्या पायावर पडला आणि सगळ्यांनीच श्वास रोखला. पण म्हणतात ना. देव तारी त्याला कोण मारी, 2 वर्षाच्या चिमुकल्याचा हात फ्रॅक्चर झाला असला तरी त्याचा जीव वाचलाय. या चिमुकल्याला कसं वाचवलं, तो काही सेकंदाचा घटनाक्रमच भावेशने साम टीव्हीला सांगितलाय.

डोंबिवलीतील देवचीपाडा येथे 13 मजली इमारत आहे.. या इमारतीच्या 3 ऱ्या मजल्यावर देसले कुटुंब राहतं. राहुल देसलेंचा 2 वर्षांचा मुलगा सात्विक गच्चीतून खाली पडला. मात्र तो कसा पडला? पाहूयात.

देसले कुटुंबाच्या घरात रंगकाम सुरु होतं

खिडक्यांच्या काचा खराब होऊ नयेत म्हणून त्या काढून ठेवल्या होत्या

उघड्या ग्रिलच्या गॅपमधून चिमुकला गॅलरीत उतरला आणि खाली पडला

भावेश क्रिकेट खेळतो. म्हणूनच तो चिमुकल्याचा झेल घेऊ शकला आणि सात्विकचा जीव वाचला... मात्र घरात लहान मुलं खेळत असताना पालकांनी त्यांच्याकडे विशेष लक्ष द्यायला हवं... कारण ऐनवेळी भावेशसारखा देवदूत धावूनच येईल असं नाही...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकरी पाण्यात, जिल्हाधिकारी मग्न नाचगाण्यात, जिल्हाधिकाऱ्याचा प्रताप, नागरिकांचा संताप

Damage Lungs: खराब फुफ्फुसांचे आरोग्य सुधारण्यासाठी खा 'हे' पदार्थ, ठरतील गुणकारी

India vs Pakistan Final: आशिया कप फायनलमध्ये भारत- पाकिस्तान पुन्हा आमने सामने

Asia Cup 2025 : अभिषेक-तिलकची दमदार खेळी, संजू सॅमसनही चमकला; श्रीलंकेसमोर 'इतक्या' धावांचे आव्हान

Triglycerides in children : पालकांची चिंता वाढली; ५ ते ९ वयोगटातील मुलांमध्ये वाढतोय भयंकर आजार

SCROLL FOR NEXT