अभिजीत देशमुख, प्रतिनिधी....
Dombivali Fraud News: विविध योजनांमध्ये चांगला नफा देण्याचे सांगत पतपेढी संचालकांनी दोन वर्षात 47 ग्राहकांना सुमारे 17 लाखांची फसवणूक केल्याची घटना डोंबिवलीत घडली होती. त्यानंतर हे भामटे पतपेढीला टाळे मारुन फरार झाले होते.
या प्रकरणी गुन्हे दाखल करत राम नगर पोलिसांनी शाखा मॅनेजर सागर डोंगरे, संचालक राजेंद्र चोपडे, संचालक भास्कर कोंडाजी बिन्नर आणि संचालक विष्णु दिनकर यांना अटक केली आहे .
काय आहे संपूर्ण प्रकरण?
याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, डोंबिवली (Dombivali) पश्चिम परिसरात श्रमसंपदा निधी लिमिटेड ही पतपेढी सुरू करण्यात आली होती. या पतपेढीच्या माध्यमातून विविध योजनांमध्ये गुंतवणूक करुन चांगला नफा मिळवण्याचे आमिष नागरिकांना दाखवले. काही नागरिकांनी आमिषाला बळी पडून पैसेही गुंतवले.
या पतपेढीत दैनंदिन ठेवी, आरडी, एफडी स्वरुपात 47 ग्राहकांनी 1 फेब्रुवारी 2020 ते 30 सप्टेंबर 2022 दरम्यान 17 लाख 36 हजार 441 रुपयांची गुंतवणूक केली. पैसे मिळाल्यानंतर संचालक, शाखा मॅनेजर पतपेढीला टाळे मारुन फरार झाले. यानंतर आपली फसवणूक (Fraud) झाल्याचे ग्राहकांच्या लक्षात आले.
याप्रकरणी एका ग्राहकाच्या फिर्यादीवरुन पतपेढीचे संचालक आणि शाखा मॅनेजरविरोधात डोंबिवली पोलीस (Police) ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तक्रारीनंतर या बाबतचा पोलिसांनी तपास सुरू करत शाखा मॅनेजर सागर डोंगरे, संचालक राजेंद्र चोपडे, संचालक भास्कर बिन्नर आणि संचालक विष्णु दिनकर या आरोपींना अटक केली आहे. याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश सानप हे अधिक तपास करत आहेत. (Latest Marathi News)
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.