Crime news Saam TV
मुंबई/पुणे

Dombivali Case: इन्स्टाग्रामच्या मैत्रीने घात केला, खासगी फोटोवरून करायचा ब्लॅकमेल; असा सापडला पोलिसांच्या तावडीत

Dombivali Case News: डोंबिवलीत एका तरूणाने मुलीला ब्लॅकमेल करून पैसे उकळण्याची घटना घडलीय. जवळपास ५ वर्ष आरोपी तरूणाने पीडित मुलीला अश्लील फोटो दाखवत ब्लॅकमेल केलंय. नंतर ५० हजार रूपयांची मागणी केली.

Bhagyashree Kamble

अभिजीत देशमुख, साम टीव्ही

डोंबिवलीत एका तरूणाने मुलीला ब्लॅकमेल करून पैसे उकळण्याची घटना घडलीय. जवळपास ५ वर्ष आरोपी तरूण पीडित मुलीला अश्लील फोटो दाखवत ब्लॅकमेल करत होता. नंतर ५० हजार रूपयांची मागणी केली. याच त्रासाला कंटाळून पीडित मुलीनं कुटुंबाला आपबिती सांगितली. नंतर पोलीस ठाण्यात धाव घेत तरूणाविरोधात तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं असून, आरोपीने आणखीन कुणाला फसवलंय का? याचा तपास पोलीस करीत आहेत.

पीडित मुलगी मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत आपल्या कुटुंबासोबत राहतात. कोरोना काळात शिक्षण ऑनलाईन पद्धतीने सुरू होतं. याच काळात इंस्टाग्रामवर पीडित मुलीची आरोपी तरूणाशी ओळख झाली. दोघांमध्ये रोज बोलणं व्हायचं. छान मैत्री झाली. काही दिवसानंतर आई आजारी असल्याचं खोटं सांगत त्याने मुलीकडून पैसे उकळले.

मुलीने देखील पैसे दिले. नंतर अश्लील फोटोंची मागणी केली. काही दिवसानंतर अश्लील फोटो दाखवत ब्लॅकमेल करून त्याने तिच्याकडून अधिक पैसे उकळले. जवळपास पाच वर्ष हा तरुण तिला ब्लॅकमेल करत पैशांची मागणी करीत होता. अखेर ही बाब तिच्या कुटुंबियांना माहिती पडली. पीडित मुलीने कुटुंबाला विश्वासात घेऊन आपबिती सांगितली.

पीडित मुलगी आणि कुटुंबाने तातडीने मानपाडा पोलीस ठाण्यात धाव घेत तरूणाविरूद्ध तक्रार दाखल केली. या प्रकरणी मानपाडाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने आणि पोलिस अधिकारी राम चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू होता. तपासादरम्यान पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेण्यासाठी सापळा रचला.

त्या तरुणाने पुन्हा आकाश या इन्स्टाग्राम प्रोफाईलच्या माध्यमातून त्या विद्यार्थिनीला संपर्क साधला. पुन्हा पैशांची मागणी केली. विद्यार्थिनीचे अश्लील फोटो दाखवत ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला आणि पन्नास हजार रूपयांची मागणी केली. पोलिसांना ही बाब माहित पडताच, नवी मुंबई येथे एका ठिकाणी सापळा रचला. त्या तरुणाला नवी मुंबई येथे यायला सांगितले. मात्र तो तरुण आला नाही.

पुन्हा पोलिसांनी इन्सटाग्राम आणि तांत्रिक बाबीच्या तपास करत, त्या आरोपीला छत्रपती संभाजीनगर येथून बेड्या ठोकल्या. आकाश दाभाडे असे तरुणाचं नाव असून, आकाशला दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आकाशने याआधी अशा किती मुलींना फसवले याचा तपास मानपाडा पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident News : महामार्गावर अपघाताचा थरार! दुचाकी आणि प्रवाशांनी भरलेल्या बसची समोरासमोर धडक; तरुणाचा होरपळून मृत्यू

Maharashtra Live News Update: संग्रामपूर तालुक्यात वादळी पावसाचा फटका; पळशी झाशी शिवारातील मका पिकाचे मोठे नुकसान

महाराणी ताराराणी जैन समुदायाच्या होत्या; जैन मुनी आचार्य नयन पद्मसागर यांच्या वक्तव्याने नवा वाद

Petrol Pump Fraud Tips: कार आणि बाईकमध्ये पेट्रोल भरताना 5 गोष्टी लक्षात ठेवा, तुमची फसवणूक होणार नाही

पुणे विद्यापीठाच्या परीक्षा पत्रिका पावसात भिजल्या; विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात|VIDEO

SCROLL FOR NEXT