Dombivali Crime Saam Tv
मुंबई/पुणे

डोंबिवलीत दिवसाढवळ्या ज्वेलर्सवर चाकूने हल्ला; थरार CCTVत कैद

Dombivali Crime : याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

प्रदीप भणगे

डोंबिवली : डोंबिवलीत (Dombivali) धक्कादायक प्रकार घडला आहे. डोंबिवलीतील पूर्वेतील आगरकर रोडवरील मन्ना गोल्ड ज्वेलर्सच्या दुकानात घुसून दुकानाचे मालक तारकनाथ मन्ना (वय ५४) यांच्यावर एका अज्ञात मारेकऱ्याने चाकूने हल्ला केल्याची घटना मंगळवारी घडली आहे. या हल्ल्यात व्यापारी मन्ना हे गंभीर जखमी झाले असून हा प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे. (Dombivali Crime News Knife attack on jewelers)

याप्रकरणी रामनगर पोलीस (Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारेकऱ्याने दुकानातील कोणतीही वस्तू चोरुन न नेल्याने पूर्व वैमनस्यातून हा हल्ला झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. डोंबिवली पूर्वेला आगरकर रोड परिसरात राहणारे व्यापारी तारकनाथ मन्ना यांचे याच रोडवर मन्ना गोल्ड नावाचे ज्वेलर्सचे दुकान आहे. मंगळवारी दुपारी ते दुकानात बसले असता अचानक एक मास्क घातलेला माणूस दुकानात आला. त्याने मन्ना यांना धारदार चाकू दाखवत चूप बैठो असे बोलत त्यांच्यावर वार करून पळ काढला.

याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर याबाबत रामनगर पोलीस ठाण्याचे पीआय सचिन सांडभोर यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, या सर्व घटनेनंतर आम्ही गुन्हा दाखल केला असून आमचा तपास सुरू आहे. या संपूर्ण प्रकरणाचा छडा लावल्यावरच आम्ही कॅमरा बोलू असे सांगितले.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amla Benefits : सकाळी रिकाम्या पोटी आवळा खाल्ला तर काय होते? 'हे' ५ फायदे तुम्हाला थक्क करतील

Inspiring Story: 55 वर्षीय मिठारी गुरूजींची प्रेरणादायी कहाणी; एका विद्यार्थिनीसाठी जंगलातून 5 किमी पायपीट

Thane Firing: मोठी बातमी! ठाण्यात ठाकरे गटाच्या नेत्यावर गोळीबार, उपचारादरम्यान पूर्णेकर यांचा मृत्यू

पुणे महापालिका नोकरभरती घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जेजुरी देवस्थानच्या माजी विश्वस्ताला अटक

'राम श्रीमंतांचा, महादेव गरिबांचा देव'; मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचं वादग्रस्त विधान

SCROLL FOR NEXT