Corona Update Saam TV
मुंबई/पुणे

Corona Update: राज्यातील डॉक्टर कोरोनाच्या विळख्यात; मुंबईतील सर्वाधिक

राज्यातील प्रंटलाईन कामगारांना बुस्टर डोस देण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद मोदी (Narendra Modi) यांनी केली आहे.

साम टिव्ही ब्युरो

सुशांत सावंत

मुंबई : राज्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. ओमिक्रॉनचा धोकाही दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे राज्यातील अनेक डॉक्टरही कोरोनाच्या विळख्यात अडकत आहेत. सर्वाधिक बाधित डॉक्टर मुंबईतील असल्याचे समोर आले आहे. जेजे रुग्णालयातील 59 डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली आहे. सायन रुग्णालयात 50 डॉक्टर कोरोना (Coronavirus) विळख्यात अडकले आहेत. त्यामुळे कोरोनासारख्या घातक महामारीसमोर आशेचा किरण असलेले डॉक्टरच कोरोनाबाधित होत असतील तर ही नक्कीच चिंतेची बाब आहे.

नायर - 40, केईम -40, ठाणे - 8, धुळे - 8, कूपर - 7, पुणे ससून -5, लातूर - 1 , मिरज - 1 , औरंगाबाद -1 , नागपुर -1 येथील डॉक्टर कोरोनाबाधित झाले आहेत. त्यामुळे राज्याची चिंता वाढली आहे. आज कोरोना रुग्णांचा वाढता आकडा 18 हजारांवर गेला आहे. मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे राज्यातील आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. राज्यातील प्रंटलाईन कामगारांना बुस्टर डोस देण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद मोदी (Narendra Modi) यांनी केली आहे. त्यामुळे येत्या 10 तारखेपासून राज्यातील त्यांना लसीकरणाला सुरुवात होत आहे.

दरम्यान राज्यातील 15 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांच्या लसीकरणालाही सुरुवात झाली आहे. राज्यात तिसरी लाट ही ओमिक्रॉनची (Omicron) असेल असं मत तज्ञांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे जास्तीत जास्त भर हा लसीकरणावर दिला जात आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यात झालेल्या बैठकीत निर्बंध कडक करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. आज रात्रीपासून नक्की कोणते निर्बंध असतील हे सांगण्यात येणार आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, लोकल २५ मिनिटे उशिरा

Thursday Horoscope: करिअरमध्ये नवीन संधी येणार; पण जास्त कष्ट घ्यावे लागणार, 'या' राशींच्या व्यक्तींना कर्मचाऱ्यांकडूनच त्रास होणार

T20 World Cup : वर्ल्डकपमधून विश्वविजेतेपदाचा प्रबळ दावेदार संघ आऊट, श्रीलंका बाहेर; न्यूझीलंडचा दणदणीत विजय

MSRTC: शिवशाही बस आता नव्या अवतारात येणार; राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

राज्यात रस्ता अपघाती मृत्यूदरात लक्षणीय घट; सरकारचे कोणते उपाय ठरताहेत गेम चेंजर?

SCROLL FOR NEXT