Dnyaneshwar Hingolikar was awarded this year's Dr. Nanasaheb Parulekar Award  Saam TV
मुंबई/पुणे

ज्ञानेश्वर चौतमल यांना यंदाचा 'डॉ. नानासाहेब परुळेकर पुरस्कार'

ज्ञानेश्वर चौतमल हे मुळचे मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यातील आहेत. किर्तनकार ते टिव्ही पत्रकार असा त्यांचा आत्तापर्यंतचा प्रवास राहिलेला आहे.

साम टिव्ही ब्युरो

पुणे : सकाळ माध्यम समूहातील 'साम टीव्ही न्यूज'चे पुणे जिल्हा प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल यांना यंदाचा ‘डॉ. नानासाहेब परुळेकर स्मृती पुरस्कार २०२२’ प्रदान करण्यात आला. राजकीय विश्लेषक, ‘द प्रिंट‘चे संस्थापक-संपादक, पद्म भूषण शेखर गुप्ता (दिल्ली), सकाळ समुहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार, संपादक-संचालक श्रीराम पवार, संपादक सम्राट फडणीस यांच्या हस्ते ज्ञानेश्वर चौतमल यांना गौरविण्यात आले. पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात हा सोहळा पार पडला.

‘सकाळ' चे संस्थापक-संपादक डॉ. नानासाहेब परुळेकर यांच्या जयंतीनिमित्त सर्वोत्तम पत्रकारांना पुरस्कार प्रदान केला जातो. विविध विषयांवर आणि सामाजिक प्रश्‍नांवर सातत्याने लेखन किंवा वार्तांकन करणाऱ्या ‘सकाळ समूहा’तील पत्रकारांना दरवर्षी या पुरस्काराने गौरविण्यात येते. स्वातंत्र्यसैनिक व ज्येष्ठ पत्रकार (कै) ना.अ. पेंडसे यांनी दिलेल्या निधीतून हा पुरस्कार देण्यात येतो.

यंदा डॉ. नानासाहेब परुळेकर यांच्या जयंतीचे १२५ वे वर्षे होते. यानिमित्ताने ज्ञानेश्वर चौतमल यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. राज्यात सत्तानाट्य घडत असताना ज्ञानेश्वर चौतमल यांनी साम टीव्हीला उद्धव ठाकरे हे राज्यपालांना राजीनामा देत असतानाची EXCLUSIVE दृष्य मिळवून दिली.

चौतमल हे मुंबई, पुण्यासह राज्यभर महत्त्वाच्या घडामोडींचे ते वार्तांकन करत असतात. सामाजिक प्रश्न लावून धरणे, शोधपत्रकारिता, परिणामकारक बातमीदारी ही त्यांची वैशिष्ट्ये आहेत. साम टीव्हीतील अशाच सर्वोत्तम कामगिरीबद्दल चौतमल यांना या वर्षीचा डॉ. नानासाहेब परुळेकर स्मृती पुरस्कार देण्यात आला.

ज्ञानेश्वर चौतमल हे मुळचे मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यातील आहेत. किर्तनकार ते टिव्ही पत्रकार असा त्यांचा आत्तापर्यंतचा प्रवास राहिलेला आहे. विविध माध्यम समूहात त्यांनी यापूर्वी काम केले आहे. याशिवाय त्यांनी राज्य आणि देश पातळीवर शेकडो वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धांचे विजेतेपदही पटकावले आहे.

पत्रकारितेतील प्रतिष्ठेचा असणारा स्वातंत्र्यसैनिक व पत्रकार ना.अ.पेंडसे पुरस्कृत डॉ. नानासाहेब परुळेकर स्मृती पुरस्कार मिळाल्याबद्दल पत्रकार ज्ञानेश्वर चौतमल यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : सोलापूरमध्ये अवकाळी पाऊस-गारपिटीचा कहर; 3 एकर पपईची बाग उद्ध्वस्त, शेतकरी हतबल

Paneer Paratha: घरच्या घरी बनवा ढाबा स्टाईल पनीर पराठा; नाश्त्याचा बेत होईल भारी

By-Election: बारामती-राहुरी पोटनिवडणुकीत 'मविआ'चा धर्म की राष्ट्रवादीला साथ? उद्धव ठाकरे काय करणार?

Pune : शक्तिवर्धक औषध घेणं जिवावर बेतलं ! धावता-धावता मानसिक संतुलन बिघडलं, पोलीस भरती दरम्यान घडला भयानक प्रकार

Marathi Singer Death: प्रसिद्ध मराठमोळा गायक कालवश; राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास, संगीतविश्वात शोककळा

SCROLL FOR NEXT