divorce cases increased in pune  Saam tv
मुंबई/पुणे

पुण्यात दिवसाला 10 घटस्फोट; हजारो पुणेकर का घेतायत काडीमोड? VIDEO

divorce cases in pune : व्हॅलेंटाईन आठवडा साजरा होत असतानाच दुसरीकडे पुण्यात घटस्फोटांचा पूर आलाय... मात्र पुण्यात घटस्फोटांचं प्रमाण किती आहे.... आणि घटस्फोटांचं प्रमाण किती आहे...पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट...

Snehil Shivaji

उत्साहात व्हँलेटाईंन आठवडा साजरा करुन प्रेमाच्या आणाभाका घेऊन झाल्या असतील तर जरा ही बातमी डोळे उघडून पाहा आणि लक्ष देऊन ऐका... सांस्कृतिक शहर असणाऱ्या पुण्यात दिवसाला 10 - 10 जोडप्यांचे घटस्फोट होऊ लागलेत. होय एकएका दिवसाला 10 हून अधिक जोडपे घटस्फोटासाठी थेट न्यायालयात धाव घेतायेत. ही आकडेवारी धक्कादायक असून लग्नसंस्थेला संकटात आणणारी आहे असं म्हणलं तरी चुकीचं ठरणार नाही.

पुण्यात घटस्फोटांचा पूर

शिवाजीनगर कौटुंबिक न्यायालयात घटस्फोट प्रकरणात वाढ

दरवर्षी 4,000 पेक्षा अधिक घटस्फोट अर्ज

सरासरी दररोज 10 हून अधिक जोडप्यांचे अर्ज

घरगुती हिंसाचारात 50% घट

पूर्वी घरगुती हिंसाचारामुळे विभक्त होण्याचं अधिक असायचं मात्र आता घरगुती हिंसाचाराचं प्रमाण 50 टक्क्यांनी कमी झालं असलं तरी देखील वैष्णवी हागवणे, दिप्ती चौधरी आत्महत्या प्रकरणं विसरुन चालणार नाही. 2024 या एका वर्षात 5 हजार ते साडेपाच हजार विवाह नोंदणी झालेली असतांना 4000 पेक्षा अधिक जोडप्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतलाय..त्यामुळेच घटस्फोटांच्या कारणांकडे गांभिर्यानं पाहणं गरजेचंय.

घटस्फोटांची नवी कारणं

बदलती जीवनशैली आणि नातेसंबंधांमधील तणाव

कामाच्या ताणामुळे निर्माण होणारा दुरावा

भावनिक आणि आर्थिक मतभेद

वैयक्तिक स्वातंत्र्याचा हक्क

अशा एक ना अनेक कारणांमुळे हल्ली तरुण जोडप्यांमध्ये घटस्फोटांचे प्रमाण वाढत चाललंय. अत्यंत क्षुल्लक कारणंही नातेसंबंधांमधील तणावासाठी मोठी ठरतायेत. लग्नसंस्था टिकवायची असेल तर प्रेमाचं नातंच अधिक बळकट करणं गरजेचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

LPG Cylinder: पश्चिम-आशियाच्या युद्धाचा गॅस पुरवठ्यावर परिणाम; गॅसच्या दरवाढीदरम्यान सरकारचा LPG सिलिंडरबाबत मोठा निर्णय

Maharashtra Live News Update :नालासोपारात पिसाटलेल्या रेड्याचा धुमाकूळ; दुचाकीला धडक देत दुकानात घुसला

Mumbai : संजय गांधी राष्ट्रीय उद्यान प्रशासन आणि स्थानिक रहिवाशांचा वाद पुन्हा चिघळला; उपमुख्यमंत्री शिंदेंकडे केली मोठी मागणी

Chat GPT ला विचारलं आत्महत्या कशी करायची? स्वामीनारायण मंदिरात आढळले दोन तरुणींचे मृतदेह

Jeera Ajwain Water Benefits: रोज सकाळी उठल्यावर जीरा ओवा पाणी प्यायल्याने होतील हे आरोग्यदायी फायदे

SCROLL FOR NEXT