crime news , dombivli, police , ramnagar police station SaamTv
मुंबई/पुणे

Dombivli Crime News : रामनगर पोलिस ठाणे परिसरात महिेलेस मारहाण; युवकावर गुन्हा दाखल

अंजली यांच्या डोक्यातून रक्त वहात असल्याने स्टेशन परिसरातील एका खासगी रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

प्रदीप भणगे

डोंबिवली : डोंबिवली येथे रामनगर पोलिस ठाण्याच्या परिसरात एका ज्येष्ठ महिलेस किरकाेळ कारणावारुन एका युवकानं मारहाण केली. यावेळी जमावानं संबंधित युवकास पकडले. त्याला पाेलीस ठाण्यात नेऊन घडलेला प्रकार सांगून त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. पाेलीसांनी या प्रकरणी युवकावर (youth) गुन्हा दाखल केला. (Latest Marathi News)

डोंबिवली मधील तुकाराम नगर परिसरात राहणाऱ्या अंजली देवडिगा (वय 64) या रविवारी सायंकाळी खरेदीसाठी डोंबिवली स्टेशन परिसरात खरेदीसाठी आल्या होत्या. खरेदी केल्यानंतर सायंकाळी सहा वाजता त्या साहित्य घेऊन रामनगर पोलिस ठाण्याच्या परिसरात असलेल्या रिक्षा थांब्यावर रिक्षा पकडण्यासाठी आल्या.

त्या ठिकाणी तिघे तरुण बाजूने जात असताना त्यातील सोहमचा अंजली यांना धक्का लागला. यावेळी अंजली यांन माफी मागून पुढे जाण्याचा प्रयत्न केला. मात्र सोहमने त्यांना जोरात धक्का दिला. या धक्क्याने अंजली रस्त्यावर पडल्या. त्यांच्या हाताला मार लागला. (Tajya Batmya)

त्यानंतर संतापलेल्या सोहमने हातातील कडा काढून त्यांच्या डोक्यात मारला. यामुळे अंजली यांच्या डोक्यातून रक्तस्त्राव होऊ लागला. हे पाहून जमलेल्या जमावाने सोहम याला पकडून जवळच असलेल्या रामनगर पोलीस ठाण्यात नेले.

अंजली यांना देखील पोलीस ठाण्यात नेण्यात आले. तेथे दिवा येथे राहणाऱ्या सोहम याच्या विरोधात (कलम 324 अंतर्गत) गुन्हा दाखल करत त्याला नोटीस बजावण्यात आली आहे. अंजली यांच्या डोक्यातून रक्त वहात असल्याने स्टेशन परिसरातील एका खासगी रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. सोमवारी सायंकाळी उपचाराअंती त्यांना घरी सोडण्यात आले आहे. (Maharashtra News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Datiya Bypoll : निवडणुकीत पराभव होताच भाजपचा मोठा निर्णय; अख्खी कार्यकारिणी बरखास्त, पक्षात खळबळ

Maharashtra News Live Update: मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी

संध्याकाळी टाईमपास खायला बनवा क्रिस्पी मखाना चिवडा; रेसिपी आहे एकदम सोपी

Thursday Horoscope: घरातले वातावरण आनंद राहील; 8 राशींच्या व्यक्तींची भरभराट होणार, वाचा उद्याचे राशीभविष्य

Fatty Liver Disease: पायांमध्ये ही 3 महत्त्वाची लक्षणं दिसली तर समजा लिव्हरवर चरबी साचलीये!

SCROLL FOR NEXT