‘या’ जिल्ह्यात येत्या पाच दिवस अतिमुसळधार पाऊस; हवामान विभागानं दिला इशारा Saam Tv
मुंबई/पुणे

‘या’ जिल्ह्यात येत्या पाच दिवस अतिमुसळधार पाऊस; हवामान विभागानं दिला इशारा

सध्या बंगालच्या उपसागरामध्ये हवेचा कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. यामुळे मागील ४-५ दिवसांपासून पूर्व विदर्भासहीत मध्य महाराष्ट्र मध्ये पावसाच्या सरी कोसळले

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : सध्या बंगालच्या उपसागरामध्ये हवेचा कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. यामुळे मागील ४-५ दिवसांपासून पूर्व विदर्भासहीत मध्य महाराष्ट्र मध्ये पावसाच्या सरी कोसळले Rain Maharashtra आहेत. त्यानंतर आता राज्यामध्ये १ आठवडा उघडीप घेतल्यावर राज्यामध्ये पावसाकरिता पोषक हवामान तयार व्हायला सुरुवात झाली आहे.

याच पार्श्वभूमीवर पुढील ५ दिवस राज्यामध्ये अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची Heavy to very heavy Rainfall alert शक्यता हवामान विभागांकडून वर्तवण्यात आली आहे. पुढील ५ दिवसांकरिता हवामान विभागाने IMD बऱ्याच जिल्ह्यांना हाय अलर्ट देण्यात आले आहे. खरेतर, बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने संपूर्ण पश्चिम आणि मध्य भारतामध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हे देखील पहा-

यामुळे महाराष्ट्रातील काही भाग वळगळाता राज्यात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज विदर्भालासहीत मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणात जोरदार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. कोकणामधील सिंधुदुर्ग, बीड, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, आणि चंद्रपूर या ११ जिल्ह्यांना हवामान विभागाने येलो अलर्ट Yellow Alert जारी करण्यात आला आहे.

संबंधित ११ जिल्ह्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासहीत जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर उद्याही राज्यामध्ये कमी जास्त प्रमाणात अशीच स्थिती राहाणार आहे. मात्र, सोमवारपासून राज्यामध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. सोमवारी परभणी जिल्ह्यांला हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट Orange alert जारी करण्यात आला आहे. तर मंगळवारी नाशिक, ठाणे आणि रायगड या ३ जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.

पुढील ४ ते ५ दिवस राज्यात अनेक ठिकाणी पावसाच्या मोठ्या सरी कोसळणार आहेत. मागील काही दिवसांपासून मुंबईत पावसाने उसंत घेतली आहे. दरम्यानच्या काळात काही ठिकाणी हलक्या पावसाची नोंद करण्यात आली आहे. पण मंगळवारी आणि बुधवारी म्हणजेच ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर दिवशी मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून मुंबईसह महाराष्ट्रामध्ये चांगल्या पावसाची शक्यता या अगोदर हवामान विभागाकडून वर्तवण्यात आले आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ambernath Accident: अंबरनाथमध्ये भीषण अपघात, ४ जणांचा मृत्यू, अपघातग्रस्त कारमध्ये शिवसेनेच्या महिला उमेदवार

IAS Transfers: पुणे महापालिकेतील उपायुक्तांच्या पुन्हा बदल्या; अधिकारी धास्तावले

भाजपचा क्लीन स्वीप? १०० पेक्षा अधिक नगरसेवकांनी बिनविरोध उधळला विजयाचा गुलाल, स्थानिक पातळीवर कमळ फुललं |VIDEO

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीवर कारवाईचा बडगा? KYC मुळे सरकारी लाडकीचा भांडाफोड

Horoscope: 'या' ५ राशींच्या नशिबाचे चमकतील तारे; यशासह धनलाभाचा योग, जाणून तुमचं राशीभविष्य

SCROLL FOR NEXT