Sharad Pawar : शरद पवारांच्या 81 व्या वाढदिवसानिमित्त शेतकऱ्यांना 81 बैलजोड्यांचे वाटप दिलीप कांबळे
मुंबई/पुणे

Sharad Pawar : शरद पवारांच्या 81 व्या वाढदिवसानिमित्त शेतकऱ्यांना 81 बैलजोड्यांचे वाटप

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचा 81 वा वाढदिवस असल्याने 81 शेतकऱ्यांना बैलजोडीचे वाटप करण्यात आले. यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण पहायला मिळत आहे.

दिलीप कांबळे

मावळ : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तसेच माजी कृषिमंत्री शरद पवार (Sharad Pawar Birthday) यांच्या 81 व्या वाढदिवसा निमित्त मावळ तालुक्यात एक अनोखा उपक्रम राबविण्यात आला. पुणे जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन सभापती बाबुराव वायकर (Baburao Vaikar) यांच्या मार्फत तालुक्यातील सुमारे 81 गरजू शेतकऱ्यांना बैलजोडीचे वाटप करण्यात आले आहे.

हे देखील पहा -

मावळ तालुक्याला निसर्गाचं वरदान असल्याने भाताचे आगार म्हणून राज्यात मावळ प्रसिध्द आहे,परंतु मागील काही महिन्यांपासून निसर्गाचा लहरीपणा आणि अवकाळी पाऊसासह वादळ वाऱ्याने शेतकरी हतबल झाले होते. आर्थिक विवंचनेत असणाऱ्या बळीराजाकडे बैलजोडी घेण्यासाठी पैसा नसल्याने गरजू शेतकऱ्यांना (Farmers) या बैलजोडीचे वाटप करण्यात आले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचा 81 वा वाढदिवस असल्याने 81 शेतकऱ्यांना बैलजोडीचे वाटप करण्यात आले. यामुळे मावळ तालुक्यातील शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण पहायला मिळत आहे. बैलजोडी मिळाल्याचा आनंद तर शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर असला तरी बैलगाडा शर्यत ही लवकरात लवकर सुरू करावी अशी मागणी देखील यावेळी  शेतकऱ्यांनी केली आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदाच्या निवडणुकीत निलेश सांबरे हे विजयी

cabinet reshuffle : मोदी मंत्रिमंडळात मोठा भूकंप! नितीन गडकरींचे खाते बदलणार? काय आहे मोदींचा मेगा प्लॅन, जाणून घ्या...

वटपौर्णिमेच्या पूजेसाठी आरतीच्या थाटात 'या' 5 वस्तू असायलाच हव्यात

Bus Accident News : भीषण अपघात! मुंबईतून पर्यटनासाठी राजगडावर निघालेल्या पर्यटकांची बस दरीत कोसळली; २ जणांचा मृत्यू

Shocking : खळबळजनक! प्रेमसंबंधात पतीचा अडथळा, बॉयफ्रेंडच्या मदतीने पत्नीने काढला काटा

SCROLL FOR NEXT