Pune : पुण्यातील लकडी पुलावरील मेट्रोच्या कामाचा वाद मिटला; विरोध नसल्याचं गणपती मंडळांकडून स्पष्ट SaamTV
मुंबई/पुणे

Pune : लकडी पुलावरील मेट्रोच्या कामाचा वाद मिटला; विरोध नसल्याचं गणपती मंडळांकडून स्पष्ट

मागील अनेक दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकलेलं पुण्यातील लकडी पुलाचं काम अखेर सुरु करण्यास पुण्यातील प्रमुख गणेश मंडळांनी परवानगी दिली आहे.

अमोल कविटकर साम टीव्ही पुणे

पुणे : मागील अनेक दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकलेलं पुण्यातील लकडी पुलाचं काम अखेर सुरु करण्यास पुण्यातील प्रमुख गणेश मंडळांनी परवानगी दिली आहे या बाबत त्यांनी माहिती दिली असून पुण्याच्या विकासाला बाधा येईल असं आम्ही वागणार नसल्याच स्पष्ट केलं आहे. याबाबत त्यांनी अधिकृत भूमिका जाहीर केली आहे.

ते म्हणतात गेल्या 4 वर्षापासून मेट्रो (Metro) चे पुण्यात (Pune) काम सुरु आहे. मेट्रो मुळे पुण्याच्या विकासात भरच पडणार आहे यात शंका घेण्याचे काही कारणच नाही. परंतु एक मेट्रो ची मार्गिका गणपती विसर्जन मार्गावरून जात आहे. ज्यावेळी हे काम सुरु झाले त्यावेळी कोणाच्याही लक्षात आले नाही किंवा कोणी निदर्शनास आणून दिले नाही. आता काम अंतिम टप्प्यात आल्यावर संभाजी पूलावरील मेट्रोच्या पुलाच्या उंचीमुळे गणपती मंडळांच्या (Ganpati Mandal) विसर्जन मिरवणूक रथास अडथळा निर्माण होईल म्हणून मा.महापौर यांना काम बंद करणेबाबत निवेदन देण्यात आले होते.

हे देखील पहा -

मा.महापौरी (Mayor) मेट्रो चे संबंधीत अधिकारी व गणेशोत्सव मंडळ कार्यकर्ते यांच्याशी मिटींग घेऊन त्याबाबत काही मार्ग निघतोय का यासाठी जवळपास चार महिने प्रयत्न केले होते परंतु तज्ञ समिती कडून व्यवहार्य मार्ग न निघाल्याने मा.महापौर यांनी काम सुरु करण्यास सांगितले आहे. आम्ही सगळे गणपती मंडळ कार्यकर्ते असलो तरी जबाबदार पुणेकर (Pune) नागरीक आहोत आणि 125 वर्षाहून अधिक पुण्याच्या वैभवशाली गणेशोत्सवाची परंपरा असून समाज प्रबोधन,समाजहिताला प्राधान्य दिले असून संभाजी पूलावरील मेट्रो पुलाच्या उंची बाबत आमचा कधीही विरोध नव्हता कोवीडच्या (Covid-19) परिस्थितीत अत्यंत साधेपणाने हा उत्सव साजरा केला गेला प्रशासनला संपूणपणे सहकार्य सगळ्याच मंडळांनी केले होते.

अशी परंपरा लाभलेला गणेशोत्सव ह्या वेळी पुण्याच्या विकासासाठी मेट्रोचा संभाजी पूलावरील (Sambhaji Bridge) पुलास आम्ही कोणताही विरोध करीत नाही गणेशोत्सव कार्यकर्तांची भूमिका नेहमीच सकारात्मक राहिलेली आहे असं म्हणत पुण्यातील सर्व प्रमुख मंडळांनी मेट्रोच्या कामाला हिरवा कंदील दाखवला आहे त्यामुळे आता या पुलाचे काम लवकरच पुर्ण होईल अशी सर्व पुणेकरांना आशा लागून राहीली आहे. दरम्यान याबाबत ज्या मंडळांनी पुढे होईन कामासाठी ना हरकत दिली आहे ती पुढीलप्रमाणे आहेत.

मा.अण्णासाहेब थोरात, अध्यक्ष अखिल मंडई मंडळ.

मा.श्रीकांत शेटे, अध्यक्ष मानाचा पहिला गणपती, श्री कसबा गणपती मंडळ

मा.प्रसाद कुलकर्णी, अध्यक्ष मानाचा दुसरा गणपती, श्री.तांबडी जोगेश्वरी गणेशोत्सव मंडळ.

मा.प्रविण परदेशी, अध्यक्ष मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम मंडळ.

मा.विकास पवार, अध्यक्ष श्री तुळशीबाग गणपती मंडळ.

मा.रोहित टिळक, अध्यक्ष मानाचा पाचवा गणपती श्री केसरी वाडा गणेशोत्सव मंडळ.

मा.पुनित बालन, उत्सव प्रमुख श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळ.

मा.महेश सूर्यवंशी, कोषाध्यक्ष श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी..., लाडक्या बाप्पाला आज निरोप

Maharashtra Live News Update: भिवंडीतील नारपोली येथे बालाजी डाईंगला भीषण आग

Jio Recharge Plan: ७५ रुपयांचा जिओचा प्रीपेड प्लॅन! २३ दिवसांची वैधता, अतिरिक्त डेटा मोफत अन् बरंच काही...

IPS Anjana Krishna: आई टायपिस्ट, वडील कपडे विकायचे, एकेकाळी डिप्रेशनमध्ये गेल्या, तरी जिद्दीने झाल्या IPS, वाचा अंजना कृष्णा यांचा प्रेरणादायी प्रवास

Saturday Horoscope: आनंदाचा दिवस; अनंत चतुर्दशीच्या दिवशी ६ राशींना होणार धनलाभ, जाणून घ्या तुमचं राशीभविष्य

SCROLL FOR NEXT