Mumbai News Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai: कळस यात्रा पडली महागात; दोन गटात राडा, 8 ते 10 लोक जखमी

घटनेची माहिती मिळताच आरे पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.

सुरज सावंत

मुंबई - गोरेगाव पूर्वेत आरे कॉलनीमध्ये गौतम नगर परिसरात काल संध्याकाळी शिव मंदिराचा माध्यमातून कळस यात्रा काढण्यात आली होती. मात्र याच कळस यात्रेत रात्री आठच्या सुमारास दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाली. या हाणामारीत ८ ते १० लोक जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच आरे पोलिसांनी (Police) घटनास्थळावर धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.

हे देखील पहा -

सध्या या परिसरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही गटातील 25 लोकांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस आणखी काही आरोपींचा शोध घेत आहेत. सध्या या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. परिसरात तणावपूर्ण शांतता आहे.

दरम्यान, राज्यात इतर ठिकाणीही वाद उसळला होता. अचलपूर (Achalpur) येथे रविवारी रात्री बारा वाजताच्या सुमारास झेंडा काढण्यातचा झालेला वाद विकोपाला गेल्याने दगडफेक झाल्याने शहरात संचारबंदी (Curfew) लावण्यात आली आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. ठिकठिकाणी पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर परिस्थिती नियंत्रणा आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: राधाकृष्ण विखे पाटील मनोज जरांगे यांच्या भेटीला अंतरवाली सराटीत दाखल

Dry Skin Care: बदलत्या वातावरणामुळे चेहरा ड्राय आणि डल पडला आहे? मग रोज करा हा साधा घरगुती उपाय

RBI चा मोठा निर्णय! कार, स्मार्टवॉच अन् टीव्हीद्वारे करता येणार UPI पेमेंट

Maharashtra Politics : शिंदे गटाला मोठा झटका, मोठ्या नेत्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

Khare Shankarpali Recipe : यंदा दिवाळीला खास बनवा खुसखुशीत खारी शंकरपाळी, फक्त १० मिनिटांत रेसिपी तयार

SCROLL FOR NEXT