Deepak Kesarkar Vs Rajan Teli Saam Tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics: 'भाजपासाठी मी माझा बळी दिला', केसरकर यांच्या अडचणी वाढणार? महायुतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर

Satish Kengar

विनायक वंजारे, साम टीव्ही, प्रतिनिधी

विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर प्रत्येक पक्षातील नेते उमेदवारीसाठी प्रयत्नशील असलेले पाहायला मिळत आहेत. राज्यात भाजपा आणि शिंदे गट शिवसेना यांची युती आहे. मात्र सिंधुदुर्गातील सावंतवाडी मतदारसंघात या युतीत मिठाचा खडा पडल्याचं पाहायला मिळत आहे. विद्यमान आमदार दिपक केसरकर यांच्याविरोधात भाजपा स्थानिक नेते तथा सावंतवाडी मतदारसंघ विधानसभा प्रचार प्रमुख राजन तेली यांनी रणशिंग फुंकलेय.

भाजपाकडून इच्छुक असल्याने राजन तेली यांनी दिपक केसरकर यांच्यावर टिकास्त्र सोडलं असून दोघांमध्ये सध्या शीत युद्ध सुरु आहे. राजन तेली यांनी आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी शक्ती प्रदर्शन करत सावंतवाडी मतदार संघातील कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. या मेळाव्यात आपल्यावर पक्षातर्गत कारवाई झाली, तरी चालेल, मात्र आपण दिपक केसरकर यांचा प्रचार करणार नाही, अशी भूमिका घेतली. तर तेली इतर पक्षात प्रवेश करणार का? याबाबत मात्र कमालीची गुप्तता ठेवली गेलीय.

'मी रस्त्यासाठी निधी आणला, नारळ दीपक केसरकर फोडतात'

आपली भूमिका मांडत राजन तेली म्हणाले आहेत की, ''2014 मध्ये भाजपसाठी मी माझा बळी दिला. 2019 एबी फॉर्म काढून टाकला, पक्षाने जर मला एबी फॉर्म दिला असता तर त्याच वेळेला दीपक केसरकर यांचा त्याच वेळी पत्ता कट झाला असता. आम्ही किती अन्याय सहन करायचा? मी रस्त्यासाठी निधी आणला, नारळ दीपक केसरकर फोडतात.''

ते म्हणाले, ''दीपक केसरकर महान कार्यकर्ते मुख्यमंत्र्यानंतर, त्यांचं नाव येईल. दरवेळेला मी केलं, मी केलं.. आम्ही केलं असतं कधी म्हणणार? मीच योगदान नाहीतर सावंतवाडीमध्ये भाजपचे पण योगदान आहे. 32 वर्षापूर्वी ताजला जागा दिल्या गेल्यात. 140 हेक्टरमधील नऊ एकर जमीन शेतकरी मागत आहेत. ताजचे मोठे हॉटेल व्हावं, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.''

तेली पुढे म्हणाले, ''गिरीश महाजन सावंतवाडी मतदारसघात आले, हे आम्हाला माहितीच नाही. बेळाघरचा प्रश्न सुटलाय याची खोटी कागदपत्र दीपक केसरकर यांनी गिरीश महाजन यांना दाखवली. दीपक केसरकर पळकुटे मंत्री, कालच्या प्रकारानंतर पळून जाण्याचा प्रयत्न केला, असा आरोप त्यांनी केला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Karwa Chauth 2024 : करवा चौथच्या दिवशी राशीनुसार करा या गोष्टींचे दान; अखंड सौभाग्यवती राहाल

Uddhav Thackaeray Health: उद्धव ठाकरेंवर अँजिओप्लास्टी; ब्लॉकेज आढळल्यानं लगेच शस्त्रक्रिया

Baba Siddique News : सलमानशी मैत्री, बिश्नोईची धास्ती; धमकी, रेकीनंतर मित्राला संपवलं, पाहा स्पेशल रिपोर्ट

Bath Tips : तुम्हीही अंघोळ करताना या चुका करता? वाचा आणि सवयी बदला

Canada vs India : भारत आणि कॅनडात तणाव; भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने कॅनडाच्या सरकारला खडसावले, काय आहे कारण जाणून घ्या

SCROLL FOR NEXT