disha salian case  Saam tv
मुंबई/पुणे

Disha Salian : दिशा सालियन प्रकरणात किशोरी पेडणेकरांचा दबाव; गंभीर आरोपावर पेडणेकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...

Disha Salian Latest News : दिशा सालियन मृत्यू प्रकरणात तत्कालीन महापौरांचा दबाव असल्याचा आरोप तिच्या वडिलांनी याचिकेतून केला आहे. वडिलांच्या आरोपांनंतर खळबळ उडाली आहे.

Vishal Gangurde

दिशा सालियन प्रकरणी मोठी अपडेट हाती आली आहे. दिशा सालियन मृत्यू प्रकरणी नव्याने चौकशी करण्याची मागणी तिच्या वडिलांनी याचिकेतून केली आहे. दिशा सालियनचा बलात्कार करून हत्या केल्याचा आरोप तिच्या वडिलांनी याचिकेतून केला आहे. या प्रकरणात दिशा सालियनच्या वडिलांनी कोर्टात धाव घेतली आहे. दिशा सालियनच्या वडिलांनी आरोप केल्यानंतर खळबळ उडाली आहे.

दिशा सालियनच्या वडिलांनी याचिकेत सूरज पांचोली, आदित्य ठाकरे आणि डिनो मोरिया यांच्यावरही आरोप केला आहे. तसेच या प्रकरणात माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावरही दबाव टाकल्याचा आरोप करण्यात आला आहे. याच आरोपांवर माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

दिशा सालियन यांच्या वडिलांनी याचिकेतून गंभीर आरोप केल्यानंतर खळबळ उडाली आहे. दिशा सालियनच्या वडिलांनी केलेल्या आरोपांवर किशोरी पेडणेकर यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. किशोरी पेडणेकर म्हणाल्या,'दिशा सालियनच्या वडिलांनी काही आरोप करो. हत्या प्रकरणानंतर त्यांच्या घरी गेली होती. मी उघड उघड घरी गेली होती. त्यावेळी माध्यमे देखील होती. तिच्या पालकांसोबत उघड उघड चर्चा केली. त्यांची बायको वेगवेगळ्या चटण्या बनवते. यावरून त्यांच्यासोबत चर्चा केली.

'आमचा दुरान्वये संबंध नाही. आता महानगरपालिका निवडणुका येत आहेत. एक आरोप केला. तो मागे पडला. त्यानंतर आता दुसरा. तिचे वडील आले होते. हे उघड उघड आहे. दिशा सालियनचे वडील महापौर बंगल्यावर येऊन मला विनंती केली होती. मला वाटतं, त्यांनी लेखी दिलं होतं. त्यांचे अनेकदा फोन आले होते, अशा त्या पुढे म्हणाल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: धुळ्यात तऱ्हाडी शिवारात बिबट्याचा महिलेवर प्राणघातक हल्ला

मोठी बातमी! ठाकरेंच्या विश्वासू आमदाराच्या कारने पादचाऱ्याला उडवले, राजकारणात खळबळ

Coconut Oil vs Mustard Oil : नारळाचे तेल की मोहरीचे तेल? आरोग्यासाठी कोणते तेल फायदेशीर?

Eye health tips: ही एक सवय डोळ्यांसाठी ठरू शकते घातक; संसर्ग वाढल्यास दृष्टी गमवाण्याचाही धोका

Heart Failure: केवळ छातीत दुखणं नाही! ही 6 लक्षणं दिसली तर समजा हार्ट फेल होणारे

SCROLL FOR NEXT