Disha Salian Death Case saam tv
मुंबई/पुणे

Disha Salian Death Case: दिशा सालियन प्रकरणाला धक्कादायक वळण, सामूहिक बलात्कार करुन हत्या; वडिलांचा आरोप

Disha Salian Death Case: दिशा सालियान मृत्यू प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्यात यावी अशी मागणी तिच्या वडिलांनी केलीय. त्यासाठी त्यांनी मुंबईच्या उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

Bharat Jadhav

दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियन यांच्या मृत्यूची पुन्हा चौकशी केली जाणार आहे. दिशा सालियानच्या वडिलांना याबाबत याचिका करत चौकशीची मागणी केलीय. दिशा सालियानवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती. परंतु ठाकरे गट नेत्या किशोरी पेडणेकर यांच्या दबावामुळे हे प्रकरण दाबण्यात आल्याचा आरोप दिशा सालियानचे वडील सतीश सालियान यांनी केलाय.

याप्रकरणाची एनआयए चौकशी करावी, अशी मागणी करणारी याचिका सतीश सालियान यांनी मुंबई उच्च न्यायालयात केलीय. याप्रकरणाचा तपास समीर वानखेडे यांच्यासारख्या प्रामाणिक अधिकाऱ्याच्या देखरेखीखाली करण्यात यावा, अशी मागणीही सतीश सालियान यांनी केलीय. मुंबई पोलीस आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिशाभूल करून आपल्यावर दबाव टाकल्याचा आरोपही त्यांनी केलाय.

यामुळे मुलीच्या मृत्यू प्रकरणाची परत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केलीय. या याचिकेत त्यांनी गंभीर आरोप केलेत. दबाव टाकून हे प्रकरण दाबण्यात आले. नजरकैदेत ठेवून दाखवण्यात आलेल्या पुराव्यांना खरे असल्याचं मान्य करायला लावलं, असा आरोप दिशाच्या वडिलांनी केलेत.

दिशाच्या मृत्यूप्रकरणी आदित्य ठाकरे, सुरज पांचोली, दिनो मोर्यांवर आरोप करण्यात येत होते. त्यामुळे आता आदित्य ठाकरे यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. भाजप नेते नितेश राणे आणि पत्रकार अर्णब गोस्वामींनी दिशाच्या मृत्यूबाबत केलेल्या आरोपांमध्ये तथ्य असल्याचा दावाही सतीश सालियान यांनी याचिकेतून केलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी दुर्घटना! पाच मजली इमारत कोसळली; सिमेंटच्या ढिगाऱ्याखाली अनेकजण दबल्याची भीती

अजित पवार गटाच्या नेत्याकडून महिलेचा विनयभंग; विधवेकडे नगरसेवकानं केली शरीरसुखाची मागणी

सासूसाठी सुनबाई बिबट्याशी भिडली, संकटात नातूनेही दाखवलं धाडस

IAS Officers Suspended: ठेकेदारांच्या पैशातून यूरोप-ऑस्ट्रेलियाचा दौरा; दोन IAS अधिकारी सस्पेंड, प्रशासकीय विभागात खळबळ

हातभट्ट्यांवर वरदहस्त कुणाचा? 22 जणांच्या बळीनंतर पोलीस प्रशासन अ‍ॅक्शन मोडवर, 22 अधिकाऱ्याचं निलंबन

SCROLL FOR NEXT