शरद पवार आणि मुख्यमंत्री यांच्यात अर्धातास बैठक, नेमकी काय झाली चर्चा? Saam Tv
मुंबई/पुणे

शरद पवार आणि मुख्यमंत्री यांच्यात अर्धातास बैठक, नेमकी काय झाली चर्चा?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भेट घेतली

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे CM Uddhav Thackeray यांची आज दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार NCP Chief Sharad Pawar यांनी भेट घेतली आहे. या बैठकीमध्ये शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी राजकीय चर्चा केल्याची असल्याची माहिती समोर येत आहे. सोमवारी सह्याद्री अतिथिगृहावर या दोन्ही नेत्यांची भेट झाली आहे. मात्र, यावेळी उपस्थित असलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांमुळे राजकीय संवाद साधता आलेला नाही. त्यामुळे आज ही भेट झाल्याचे सांगितले जात आहे.

हे देखील पहा-

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात जवळपास अर्धातास चर्चा रंगली होती. यावेळी शरद पवारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बारामतीमधील innovation scientific research institute च्या उदघाटन सोहळ्याचं निमंत्रणही दिलं. या संस्थेचं उद्धघाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्तेच करण्यात येणार आहे. त्याची कार्यक्रम पत्रिका देण्यासाठीही शरद पवार मुख्यमंत्री यांना भेटायला गेले होते.

दोन दिवसांपूर्वीही शररद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात एक बैठक झाली होती. त्या बैठकीत अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानानबाबत शेतकऱ्यांना मदत, कोविड निर्बंध हटविण्याच्या संदर्भात चर्चा तसेच कोविडमुळे संकटात आलेल्या अवजड वाहतूकदारांना दिलासा देण्यासाठी अवजड वाहनांवरील वाहतूक कर कमी करण्याच्या संदर्भात चर्चा झाली होती.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अंबरनाथमध्ये शिवसेनेतर्फे अवघ्या १० रुपयांत दिवाळी फराळ साहित्य वाटप

Moong vs Chana Sprouts: मूग की चणा स्प्राउट्स, वजन कमी करण्यासाठी सकाळी नाश्त्याला काय खावे?

Pune Fort : मराठा साम्राज्याचा शेवटचा किल्ला कोणता? पुण्याजवळ लपलाय 'हा' ऐतिहासिक खजिना, दिवाळीच्या सुट्टीत नक्की फिरा

Farmers Protest: शेतकरी आंदोलनाचा तिसरा दिवस, पुणे-बंगळुरू महामार्ग ठप्पच; परिवहन विभाग अन् गोकुळच्या दूध विक्रीला फटका

Sukanya Samriddhi Yojana: सुकन्या समृद्धी योजनेत दरमहा ₹२,००० भरल्यास मुलगी होणार लखपती! मॅच्युरिटीला मिळणाऱ्या पैशांवर टॅक्स लागतो का?

SCROLL FOR NEXT