Dilip Walse Patil Saam Tv
मुंबई/पुणे

पवारांच्या घराबाहेरील आंदोलनामागे राजकीय शक्ती; गृहमंत्र्यांचा नेम कुणावर?

जे कोणी दोषी असेल त्यांच्यावर कडक कारवाई करणार

रामनाथ दवणे साम टीव्ही मुंबई

मुंबई: एसटी (ST) कर्मचाऱ्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी दगडफेक केली. अचानक सुरु झालेल्या आंदोलनामुळे गोंधळ उडाला. एसटी कामगारांच्या प्रश्नांच्या अडून काही राजकीय शक्ती हे घडवत आहेत, अशी प्रतिक्रीया गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे.

अतिशय आणि अचानक झालेली ही दुर्दैवी घटना आहे. निश्चित काळजीची घटना आहे. फेल्युअर कुठे झाले हे शोधून काढू. न्यायालयाने निर्णय दिला त्याचे स्वागत केल्या नंतर असा हल्ला केला गेला. एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर हजर व्हावे असे आवाहन दिलीप वळसे यांनी यावेळी केले.

हे देखील पहा -

एसटी कर्मचाऱ्यांना कोणी भडकविण्याचे काम करत असेल तर कारवाई केली जाईल. क्राईम कॉन्फरन्स होती त्यामुळे आम्ही सकाळ पासून तिथेच होतो. महिला आंदोलक अधिक असल्याने पोलिसांना त्यांना अडवता आले नाही. मी स्वतः सुप्रिया ताई यांच्याशी बोललो आहे. आता सगळे कंट्रोल मध्ये आले आहे असे देखील वळसे पाटील म्हणाले.

पुढे ते म्हणाले की, काही अज्ञात शक्ती असे घडविण्याचा प्रयत्न करत आहेत. ज्या चुका झाल्यात त्या तपासल्या जातील. कोण आंदोलक होते, खरेच आंदोलक होते हे तपासातून समोर येईलच. जे कोणी दोषी असेल त्यांच्यावर कडक कारवाई करणार असल्याचे देखील वळसे पाटील म्हणाले. कायदा असला तरीही सहानुभूती म्हणून आम्ही आझाद मैदानात परवानगी दिली. न्यायालयाने विलीकरण शक्य नाही हे सांगून ही आंदोलन करणे चुकीचे आहे असे देखील ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fried Rice Recipe: रात्रीचं जेवण बनवायचा कंटाळा आला आहे? 10 मिनिटांत बनवा हेल्दी आणि टेस्टी फ्राई़ड राईस

Maharashtra Live News Update: सोन्याच्या दागिन्यांचा मोह आवरला नाही आणि दोन अल्पवयीन मुलांनी केला 80 वर्षीय वृध्देचा खुन

Maharashtra Tourism: ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा, कोल्हापूरातील 'ही' सुंदर ठिकाणं पाहिलीत का?

Tringalwadi Killa : ऐतिहासिक ठिकाणी फिरायला जायचंय? त्रिंगलवाडी किल्ला ठरेल बेस्ट

Karishma Kapoor: ५१ वर्षांच्या करिश्माचा काय आहे स्किन केअर सिक्रेट; जाणून घ्या

SCROLL FOR NEXT