Dilip Walse Patil Saam tv
मुंबई/पुणे

Dilip Walse Patil : माझं राजकीय वजन कमी झालंय; दिलीप वळसे पाटील असं का म्हणाले?

Dilip Walse Patil News : माझं राजकीय वजन कमी झाल्याचं कबुली दिलीप वळसे पाटील यांनी दिलीये. ते शिरूरमध्ये बोलत होते.

रोहिदास गाडगे

राज्याच्या राजकारणात थोडं का होईना वजन कमी झाल्याची वळसे पाटलांची कबुली

विधानसभेत झाला होता १५०० मतांनी निसटता विजय

शिरूरमध्ये कोल्हेंवर साधला निशाणा

राज्याच्या राजकारणात एकेकाळी वजनदार व्यक्तिमत्त्व म्हणून माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे पाहिलं जायचं. पण आता राज्यात थोडं का होईना स्वतःचं वजन कमी झाल्याची कबुली वळसे पाटलांनी दिली आहे.

राज्यातील महायुती सरकारची वर्षपूर्ती होताचं वळसेंनी स्वतःबद्दल असं वक्तव्य केलं, आत्ताच हे वक्तव्य करण्यामागे नेमकं काय कारण असावं? वळसेंना राजकारणातील घटलेलं वजन वाढवायचं आहे का? त्यासाठी पुन्हा मंत्रीपद तर नकोय ना? अशी चर्चा यानिमित्ताने रंगण्याची शक्यता नाकारता येत नाही.

राष्ट्रवादीतील पक्षफुटीनंतर ही मंत्रिपदी वर्णी लागलेल्या दिलीप वळसेंचा 2024च्या विधानसभेत 1500 मतांनी निसटता विजय झाला. परिणामी महायुतीच्या सत्तेत त्यांना मंत्री पदावरुन डावलण्यात आलं. अशा परिस्थितीत मी कोणत्या तोंडाने मंत्रीपद मागू, असं निकालानंतर वळसेंनी समर्थकांसमोर जाहीर वक्तव्य केलं होतं.

आता राज्यातील महायुती सरकारची वर्षपूर्ती झाली आणि माझं राज्यातील वजन कमी झाल्याची कबुली वळसे पाटलांनी दिली. आता वळसेंनी हे टायमिंग का साधलं असावं? असा प्रश्न यातून उपस्थित होतोय.

वळसे पाटलांचा कोल्हेंवर निशाणा

तत्पूर्वी, शिरुर तालुक्यातील सभेत बोलताना वळसे पाटील यांनी अमोल कोल्हेंवर अप्रत्यक्षरित्या निशाणा साधला. 'अमोल कोल्हेंना निवडून दिलं, पण त्यांनी एक रुपयाचंही काम केलं नाही, अशा शब्दांत निशाणा साधला. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात चर्चेचा नवा विषय निर्माण होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL 2026: प्रियांश-कॉनॉलीच्या वादळी खेळीपुढे लखनौचा संघ ढेर, पंजाब किंग्सच्या विजयाचा पंजा

Raqesh Bapat: आधी लग्न मोडलं मग ब्रेकअप; बिग बॉस फेम राकेश बापटच्या लव्हलाईफमध्ये मोठा गोंधळ

Bigg Boss Marathi 6 Winner : अर्ध्यावर सोडली मालिका अन् थेट बिग बॉसमध्ये एन्ट्री, 'टास्क क्वीन'चा प्रवास कसा होता?

Bigg Boss Marathi 6: नशिबाचा गेम पालटला; राकेश बापट ठरला उपविजेता; तर, तन्वी कोलतेने जिंकली बिग बॉस मराठी ६ची ट्रॉफी

Bigg Boss Marathi 6 Winner : तन्वी कोलतेनं उचलली 'बिग बॉस मराठी ६' ची ट्रॉफी; राकेश बापटला दिली मात, बक्षिसात काय काय मिळाले? VIDEO

SCROLL FOR NEXT