Ajit Pawar News  Saam Tv
मुंबई/पुणे

Pune : अजित पवारांनी राजीनामा देत जनतेची माफी मागावी; 'त्या' वक्त्यव्यानंतर धर्मवीर अध्यात्मिक सेना आक्रमक

अजित पवार यांच्या छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरील वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटलं आहे.

साम टिव्ही ब्युरो

प्राची कुलकर्णी

Pune News : राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते, विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरील वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटलं आहे. अजित पवार यांच्या छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरील वक्तव्यानंतर धर्मवीर अध्यात्मिक सेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. धर्मवीर अध्यात्मिक सेनेचे प्रदेशाध्यक्ष अक्षयमहाराज भोसले यांनी अजित पवार यांच्या विरोधी पक्षनेते पदाच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. (Latest Marathi News)

धर्मवीर अध्यात्मिक सेनेचे प्रदेशाध्यक्ष अक्षयमहाराज भोसले म्हणाले, ' अजित पवार, तोंडात येईल ते बोलत राहायचं आणि समाजातील लोकांची माथी भडकवायची हे दिवस आता गेले. अजित पवार हे यापूर्वी देखील आपण एक विधान केलं होतं व आपल्याला त्या विधानामुळे घरी बसावं लागलं होतं महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. आम्हाला असे वाटले की यावरून आपण बोध घेतला असेल? पुन्हा तीच वेळ येऊ द्यायची नसेल तर आपण ज्या जिल्ह्याचे नेतृत्व करता ती भूमी संतांची व शूरवीरांची आहे किमान बोलताना आपण तारतम्य बाळगल पाहिजे'.

'शिंदे फडणवीस सरकार समाजापुढे मांडत असणार विकासाचं, आरोग्याचं , शिक्षणाचं आणि शेतकऱ्यांच्या हिताचं हिंदुत्व तुमच्या पचनी पडत नाही. आम्हाला हे कोणी शिकवलं असेल, तर ते छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांचे पितृचरण महाराष्ट्रात आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज तोच विचार घेऊन आम्ही पुढे जात आहोत', असेही पुढे म्हणाले.

'त्यामुळे अजित पवार यांनी तातडीने माफी मागत आत्मकलेश करत वढू बुद्रुक येथे संभाजी महाराज यांच्या समाधीस्थानावर जाऊन आपल्या पदाचा राजीनामा देत महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागावी,अशी मागणी धर्मवीर अध्यात्मिक सेनेचे प्रदेशाध्यक्ष अक्षयमहाराज भोसले यांनी केली.

काय म्हणाले होते अजित पवार?

अजित पवार म्हणाले, 'आपण महाराष्ट्रामध्ये राहत असून इथे अंधश्रद्धेला खतपाणी घातलं जात नाही.'बाल शौर्य पुरस्कार' हा किमान स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीदिनी द्यावा. छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक होते,धर्मवीर नव्हते.त्यांनी धर्माचा कधीच पुरस्कार केला नाही'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

काँग्रेसची 'वंचित'ला निवडणुकीसाठी साद; प्रकाश आंबेडकर काय निर्णय घेणार? VIDEO

भारतातही 16 वर्षांखालील मुलांना सोशल मीडियावर बंदी? कारण काय? VIDEO

Saturday Horoscope : येत्या काही दिवसांत मोठं काही तरी घडणार; 5 राशींच्या लोकांचे आयुष्य आनंदाने फुलून जाणार

Pune Politics : दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची युती फिस्कटली? पुण्यात नेमकं काय घडलं?

Syria Masjid Blast : मशिदीत नमाजावेळी बॉम्बस्फोट; 12 जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT