मुंबई/पुणे

Dharavi Fire: धारावीत सिलेंडरने भरलेल्या ट्रकला भीषण आग; 10 ते 15 सिलेंडरचे मोठे स्फोट

Dharavi Fire: धारावी भागत एका सिलेंडर भरलेल्या ट्रकला भीषण आग लागल्याची घटना घडलीय.

Bharat Jadhav

धारावी भागत एका सिलेंडर भरलेल्या ट्रकला भीषण आग लागल्याची घटना घडलीय. आगीमुळे सिलेंडरचे स्फोट होत आहेत. धारावी बस डेपोसमोर सिलेंडरचा ब्लास्ट झालाय. सुरुवातीला चार स्फोटाचे आवाज झाले, त्यानंतर मोठी आगीने परिसराला विळखा घातला. आगीने भीषण रुप घेतल्याने नागरिक भीती तेथून पळ काढला.

धारावीमधील बस डेपोसमोर सिलेंडर भरलेल्या ट्रकला भीषण आग लागलीय. ट्रक सिलेंडर घेऊन जात होते त्यावेळी ट्रकला अचानक आग लागली. या आगीत १० ते १५ सिलेंडरचा ब्लास्ट झाल्याचं सांगितलं जात आहे. धारावीमधील नेचर पार्क, पीएनजीपी कॉलनीत ही घटना घडली आहे. धारावीमधील नेचर पार्क, पीएनजीपी कॉलनीत ही घटना घडली. आग लागल्याची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत.

आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत, मात्र सिलेंडरचे स्फोट झाल्यानं आगीने रुद्र रुप घेतलंय. ट्रकमधील सिलेंडरचे स्फोट सातत्याने होत आहेत. अग्निशमन दलाच्या १० ते १२ गाड्या घटनास्थळी आल्या आहेत. दलाच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळले आहे एक तासात आग विझवण्यात यश आले.

आग लागलेल्या ट्रक जवळ इतर दुसरे ट्रक पार्क केलेले होते. त्यांनाही आग लागल्याची घटना घडलीय. सिलेंडरच्या स्फोटामुळे परिसर दणाणून गेला. या रस्त्यावर सिलेंडरने भरलेला ट्रक उभा होता. रात्री अचानक या ट्रकला आग लागली. आग लागल्यानंतर काही वेळातचं सिलेंडरचे स्फोट सुरू झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BOB Recruitment: बँक ऑफ बडोदात नोकरीची संधी, २५०० पदांसाठी भरती, पगार ८५००० रुपये; आजच अर्ज करा

Maharashtra Live News Update: मुंबईतील विजयी मेळाव्यासाठी नाशिकमध्ये मनसेकडून जोरदार तयारी

Raj & Uddhav Thackeray: ठाकरे बंधूंचा नवा टीझर; मराठी अस्मितेचा बुलंद आवाज पुन्हा दुमदुमला|VIDEO

Devshayani Ekadashi: देवशयनी एकादशीचं काय आहे महत्त्वं? जाणून घ्या पूजेची योग्य वेळ

Satara Crime : घरकाम करणाऱ्या महिलेने मारला डल्ला; दहा तोळे सोने लांबवीले, महिलेला पोलिसांनी केली अटक

SCROLL FOR NEXT