Dharashiv Crime News  Saam tv
मुंबई/पुणे

Dharashiv Crime : जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवलं; आधी गाडीने धडक, नंतर कोयत्याने वार, परिसरात खळबळ

Dharashiv Crime News : जमिनीच्या वादातून पती-पत्नीची हत्या झाल्याची घटना घडली. दोघांच्या हत्येने परिसरात खळबळ उडाली आहे.

Vishal Gangurde

बालाजी सुरवसे,साम टीव्ही

धाराशिव : धाराशिवात जमिनीच्या वादातून हादरवणारी घटना घडली आहे. जमिनीच्या वादातून पती-पत्नीचा निर्घुन हत्या झाल्याची घटना घडली आहे. धाराशिवात भर चौकात हत्येचा प्रकार घडला आहे. हत्येच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, धाराशिव जिल्ह्यातील करजखेडा - पाटोदा चौकात हत्येचा थरार घडला. जमीनीच्या वादातून जुन्या भांडणाची कुरापत काढून पती-पत्नीची हत्या करण्यात आली. सहदेव आणि प्रियंका पवार असं हत्या झालेल्या पती-पत्नीच नाव आहे. दोघांच्या हत्येने त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

सहदेव आणि प्रियंका पवार या दोघांना सुरुवातीला गाडीने धडक दिली. त्यानंतर कोयत्याने वार करून हत्या करण्यात आल्याची माहिती हाती आली आहे. आरोपी जीवन चव्हाण आणि हरीबा चव्हाण या बाप लेकासह अन्य जणांनी दोघांची हत्या केली असल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे.

मृत सहदेव पवार हा 15 दिवसाआधीच जामीनावर बाहेर आला होता. आरोपी आणि मृत सहदेव पवार यांच्यात जमीनीचा वाद होता. त्यातच सहदेव याच्यावर याआधी 307 चा गुन्हा दाखल झाला होता. याच प्रकरणात 15 दिवसापूर्वीच तो जामिनावर बाहेर आला होता. हत्या झाल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी या प्रकरणी अधिक तपास सुरू केला आहे.

भिवंडीत दोघा जणांची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या

भिवंडीत दोघा जणांची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या झाल्याची घटना घडली आहे. प्रफुल्ल तांगडी,तेजस तांगडी अशी हत्या झालेल्या तरुणांची नावे आहेत. तर धीरज तांगडी जखमी असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. भिवंडीत तालुक्यातील खार्डी गावात दोघांची हत्या झाली. प्रफुल्ल तांगडी भाजपच्या युवा मोर्चाचा जिल्हा उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होता.एक वर्षापूर्वी प्रफुल्ल तांगडी यावर हल्ला झाला होता. त्यानंतर आता पुन्हा हल्ला झाला. चार ते पाच हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला करून हत्या केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली .

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bike Air Filter: बाईकचा एअर फिल्टर किती किलोमीटर्सनंतर बदलावा?

Congress Protest Live Update : काँग्रेसच्या आंदोलनावर किरेन रिजिजू यांची टीका; म्हणाले, ‘काँग्रेस दिशाहीन’

Red Saree Designs For Women: महिलांसाठी लाल साड्यांच्या सुंदर डिझाईन्स, 5 पॅटर्न्स पाहून प्रेमात पडाल

Maharashtra News Live Update: MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई! आणखी एका आरोपीला अटक; आतापर्यंत १२ जणांना अटक

Hotel Safety Tips: हॉटेलमध्ये चेक-इन केल्यावर काय काय तपासून घ्यावे? 5 महत्वाच्या गोष्टी

SCROLL FOR NEXT