dharamveer movie of late shivsena leader anand dighe in controversy by mns see viral video tweet by ameya khopkar
dharamveer movie of late shivsena leader anand dighe in controversy by mns see viral video tweet by ameya khopkar Saam TV
मुंबई/पुणे

Dharmaveer : आनंद दिघेंचा आवाज दाबला गेला? धर्मवीर चित्रपटातल्या 'त्या' सीनवरुन मनसेचा आरोप

Akshay Baisane | अक्षय बैसाणे

मुंबई: ठाण्याचा ढाण्या वाघ आणि प्रति बाळासाहेब म्हणून ओळख असणारे शिवसेनेचे (Shivsena) दिवंगत नेते आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या आयुष्यावर असलेला मराठी चित्रपट धर्मवीर - मुक्काम पोस्ट ठाणे हा चित्रपट (Dharmaveer Movie) महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरला. शिवसैनिकांमध्ये हा चित्रपट तर अतिशय लोकप्रिय झाला. मात्र या चित्रपटातल्या काही सीन्सवरुन आता विविध चर्चांना उधाण आलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष तथा मनसे नेते अमेय खोपकर यांनी या चित्रपटातील एका सीनवर आक्षेप घेतला आहे. (Eknath Shinde Latest News)

अमेय खोपकरांनी पोस्ट केलेला व्हिडिओ -

अमेय खोपकरांना चित्रपटात नेमकं काय खुपलं?

मनसे नेते अमेय खोपकर यांनी तसा चित्रपटातल्या कोणत्याही सीनला विरोध केलेला नाही. मात्र धर्मवीर चित्रपट रिलीज झाला तेव्हा त्यातला एक सीनमधलं संभाषण हे थिएटरमध्ये दाखवण्यात आलं पण ओटीटी प्लॅटफॉर्मवर हे संभाषण अर्धवटच दाखवलं आहे. मुख्य म्हणजे हे या संभाषणातील आवाज हा दिवंगत आनंद दिघेंचा आहे, आणि त्याचा आवाज या सीनमधून काढून टाकण्यात आल्याचा दावा अमेय खोपकरांनी केला आहे. (MNS Ameya Khopkar Latest News)

धर्मवीरमधला 'तो' सीन कोणता?

धर्मवीर चित्रपटात आनंद दिघेंचा अपघात झाल्यानंतर जेव्हा ते ठाण्यातील रुग्णालायात दाखल होते. यावेळी त्यांना भेटण्यासाठी तेव्हाचे शिवसेना नेते आणि आताचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आनंद दिघेंची विचारपूस करण्यासाठी रुग्णालयात आले होते. चित्रपटातल्या या संवादात राज ठाकरे म्हणतात की, अहो हिंदुत्वाचं काम अजून सर्वदूर पोहोचलं नाहीये, असं पडून राहून कसं चालेल? असं राज ठाकरे आनंद दिघेंना म्हणतात. यावर आनंद दिघे जे उत्तर देतात, "ती जबाबदारी आता तुमच्या खांद्यांवर आहे." आनंद दिघेंचं हेच उत्तर थिएटरमध्ये दाखवलं पण ओटीटी प्लॅटफॉर्मवरु आनंद दिघेंचा आवाज दाबण्यात आला आहे असा आरोप खोपकरांनी केला आहे. याबाबत खोकपकरांनी ट्विटरवर व्हिडिओ शेयर केला आहे, आणि ओटोटी प्लॅटफॉर्म विरोधात निषेध व्यक्त केला आहे.

धर्मवीर चित्रपटावरुन उद्धव ठाकरे नाराज?

धर्मवीर चित्रपटात जेव्हा आनंद दिघे हे रुग्णालयात दाखल झालेले असतात. तेव्हा राज ठाकरे हे त्यांची भेट घेण्यासाठी रुग्णालयात येतात. तुमच्यासारख्या शिवसैनिकाची महाराष्ट्राला गरज आहे असं म्हणत राज हे आनंद दिघे यांच्या प्रकृतीची विचारपूस करतात. शेवटच्या क्षणी जेव्हा राज ठाकरे हे रुग्णालयातून बाहेर जाण्यासाठी निघतात. तेव्हा आनंद दिघे राज यांना म्हणतात की, हिंदुत्व तुमच्या हाती आहेत. या गोष्टीमुळे देखील उद्धव ठाकरे नाराज असल्याची चर्चा होती.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Petrol Diesel Rate: राज्यात पेट्रोल डिझेलचे नवे दर जाहीर; तुमच्या शहरातील भाव काय?

UP Hathras: हाथरसच्या चेंगराचेंगरीत 120 जणांचा बळी; सत्संगातील चेंगराचेंगरीला जबाबदार कोण?

Maratha Reservation: 'माझ्या लेकराला अन् समाजाला आरक्षण द्या', भावनिक चिठ्ठी लिहित मराठा तरुणाने संपवलं आयुष्य

Maharashtra Politics: विधानपरिषदेसाठी NCPची हायव्होल्टेज बैठक; मलिकांच्या एंट्रीनं महायुतीची कोंडी?

Rahul Gandhi News: राहुल गांधींचा दावा खोटा! पंजाबमधील कुटुंबाला पोहोचली ९८ लाखांची मदत; लष्कराची माहिती

SCROLL FOR NEXT