देवेंद्रजी तुमच्या नुसत्या वजनानेच बाबरी पडली असती - मुख्यमंत्री  SaamTVnews
मुंबई/पुणे

देवेंद्रजी तुमच्या नुसत्या वजनानेच बाबरी पडली असती - मुख्यमंत्री

बाबरी मशीद पाडतेवेळी शिवसैनिक तिथे उपस्थित नव्हतेच, तर मी स्वतः मशीद पाडतेवेळी तिथे उपस्थित होतो; असे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते.

Krushnarav Sathe

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख तसेच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सभा आज MMRDA मैदान, BKC, वांद्रे पूर्व येथे 'मास्टर सभा' पार पडली. या जाहीर सभेसाठी राज्यभरातून शिवसैनिकांनी तुफान गर्दी केली. शिवसेनेचे राज्यभरातील नेते या सभेसाठी उपस्थित राहिले. यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी राज्याचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा जोरदार समाचार घेतला.

हे देखील पाहा :

"बाबरी मशीद पाडतेवेळी शिवसैनिक तिथे उपस्थित नव्हतेच, तर मी स्वतः मशीद पाडतेवेळी तिथे उपस्थित होतो." माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या वक्तव्याचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी चांगलाच समाचार घेतला. बाबरी मशिद पाडताना देवेंद्र फडणवीस तुमचे वय काय होते? शाळेच्या कि कॉलेजच्या सहलीला गेला होता? असा सवाल उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना विचारला. तुमचं वय किती, तुम्ही बोलता किती, करता काय? असे म्हणत फडणवीसांनी हिंदुत्वासाठी काय केले असा थेट प्रश्नच ठाकरेंनी विचारला.

पुढे बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांनी बाबरी पाडली नाही. तसेच यात त्यांचा कोणताही सहभाग नव्हता. जर, देवेंद्र फडणवीस खरच बाबरी मशीद पाडायला गेले असते, तर त्यांनी नुसता मशिदीवर चढायचा प्रयत्न जरी केला असता तरी त्यांच्या वजनानेच बाबरी खाली आली असती. लोकांना मशीद पाडायला श्रम करावेच लागले नसते असा मिश्किल टोला मुख्यमंत्र्यांनी फडणवीसांना लगावला.

आता भाजपकडून सांगितलं जात आहे कि बाबरी 'मशिद' नव्हे तर ढाचा होता. तर, मग त्याकाळी संघ आणि भाजपाकडून 'मंदिर पाडले आणि मशिदी बांधली' हा प्रचार का करण्यात येत होता? असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. बाबरी मशीद पाडल्यानंतर शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा तत्कालीन किस्सा सांगताना उद्धव ठाकरे म्हणाले, "टीव्हीवर जेव्हा बाबरी मशिद पाडल्याची मी बातमी पाहिली तेव्हा बाळासाहेबांना एक फोन आला होता. मशिद पाडण्यामध्ये शिवसैनिकांचा हात आहे का? तेव्हा बाळासाहेब म्हणाले होते, शिवसैनिकांनी बाबरी पाडली असेल तर मला त्यांचा गर्व आहे, अभिमान आहे."

बाबरी मशीद पाडल्यानंतर जेव्हा कायदेशीर कारवाया सुरु झाल्या तेव्हा भाजप नेत्यांनी हात झटकायला सुरुवात केली होती. भाजपचे तत्कालीन नेते, सुंदरसिंह भंडारी यांनी बाबरी पाडण्याचे काम आमचे नसल्याचे तेव्हाच स्पष्ट केले होते. कदाचित हे काम शिवसैनिकांनी केले असेल अशी प्रतिक्रिया त्यांनी त्यावेळी माध्यमांना आणि यंत्रणांना दिली होती. मग, तेव्हाच भोंगे लावून आम्ही बाबरी पाडली असा प्रचार भाजपने का केला नाही? फडणवीसांनी तेव्हा का सांगितले नाही कि बाबरी पाडायला मी होतो? असे उद्धव ठाकरे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ratnagiri: काळीज पिळवटून टाकणारी घटना! खाडीत बुडून एकाच कुटुंबातील ४ मुलांचा मृत्यू

पुणे शिक्षक-पदवीधर निवडणुकीसाठी भाजपचा मास्टर प्लॅन; रवींद्र चव्हाण मैदानात!

YouTuber Dhruv Rathee: यूट्युबर ध्रुव राठींची 20 तासांनंतर सुटका; राठींचा पोलिसांवर गंभीर आरोप

Tukaram Mundhe: MPSCच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! आयुक्त तुकाराम मुंढेंवर सरकार सोपवणार नवी जबाबदारी

भाजपच्या तीन नेत्यांची पक्षातून हकालपट्टी; काय आहे कारण? BJPच्या कारवाईनं राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT