Devendra Fadnvis
Devendra Fadnvis Saam Tv
मुंबई/पुणे

देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरेंच्या टीकेला आज देणार प्रत्युत्तर; हनुमान चालीसानं सभेला सुरुवात

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज उद्धव ठाकरेंच्या टीकेला उत्तर देणार आहेत. काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईत बीकेसीमध्ये घेतलेल्या जाहीर सभेत भाजपासह विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मनेसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. त्यांच्या या सभेनंतर आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये सभा सुरु आहे. (Devendra Fadnvis Live)

या सभेची सुरुवात हनुमान चालीसा पठण करुन झाली आहे. काल शिवसेनेच्या सभेनंतर देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करुन या टीकेली उत्तर मिळणार असा इशारा दिला होता. आज मुंबईमध्ये उत्तर भारतीयांनी अभिनंदन सभेचे आयोजन केले आहे. या सभेत फडणवीस उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या टीकेला प्रत्युत्तर देणार आहेत. उद्धव ठाकरेंच्या सभेनंतर देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या ट्वीटमध्ये उद्धव ठाकरेंचं नाव न घेता ‘टोमणे बॉम्ब’ म्हणत टोला लगावला होता.

सभेच्या सुरुवातीला भाजप नेते आशिष शेलार यांनी भाषण केले. आशिष शेलार म्हणाले, हनुमान चालिसा आपल्या घरात म्हणाच दुसऱ्याच्या घरातही जाऊन म्हणा. हनुमान चालीसा म्हटल्यानंतर लोकांना तुरुंगात टाकलं जात आहे. मेट्रोच्या कामाला, समृद्धी महामार्गाला, आरे कारशेडला, कोस्टल रोडला शिवसेनेचा विरोध असतो आणि म्हणतात आम्ही लोकांच्या हाताला काम दिलंय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Video: शिवाजी पार्कवर मोदींचं स्वागत होत असताना राज ठाकरेंची बॉडिलॅग्वेज कशी होती?

Nagpur Crime : जुन्या वादातून युवा कॅबचालकाचा खून, दाेघांवर गुन्हा दाखल

Pani Puri: घरच्या घरी बनवा टम्म फुगलेली पाणीपुरी, सोपी रेसीपी

Actor Chandrakanth Dies : जवळच्या मैत्रिणीचा कार अपघातात मृत्यू, नैराश्यात बुडालेल्या अभिनेत्याने संपवलं जीवन

Raj Thackeray यांचा हात धरला, त्यांना पुढे आणलं! Devendra Fadnavis यांची कृती चर्चेत, Video पाहिलात?

SCROLL FOR NEXT