Rohini Gudaghe
२ चमचे तेल, एक वाटी मैदा, अर्धी वाटी रवा, अर्धा चमचा मीठ, तळण्यासाठी तेल.
पाणीपुरीची पुरी बनवण्यासाठी एका बाऊलमध्ये रवा, मैदा आणि मीठ घालून नीट मिसळून घ्या.
नंतर त्यात गरजेनुसार पाणी घालून घट्ट कणीक मळा.
त्यावर ओलं कापड ठेऊन कणीक थोडा वेळ मुरु द्या.
15 ते 20 मिनिटांनंतर कणीक पुन्हा थोडी मळा.
कणकेचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्या.
गोळ्यांच्या पुऱ्या लाटून घ्या.
एक गॅसवर तेल चांगले गरम झाल्यानंतर त्यात लाटलेल्या पुऱ्या सोडा.