Devendra Fadnavis  Saam TV
मुंबई/पुणे

मी तुम्हाला महाराष्ट्रात नकोय का? लोकसभा उमेदवारीच्या चर्चेवर फडणवीस थेट बोलले

'पुण्याचे दोन भाग होणार हा नवीन वाद कशाला काढता, जेव्हा करायचा आहे तेव्हा बघू.'

Jagdish Patil

ज्ञानेश्वर हिंगोलीकर -

पुणे: मी पुण्याचा पालक मंत्री होणार नाही, पुण्याची लोकसभा ही लढवणार नाही, तुम्हाला मी महाराष्ट्रात नकोय का? अशी मिश्किल प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पत्रकारांना विचारलेल्या प्रश्नावर दिली आहे.

आज पुण्यात नोंदणी व मुद्रांक भवनाच्या भूमिपूजन सोहळा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडला या सोहळ्यादरम्यान फडणवीसांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी बोलता होते.

फडणवीस म्हणाले, 'पुण्याचे दोन भाग होणार हा नवीन वाद कशाला काढता, जेव्हा करायचा आहे तेव्हा बघू राज्य सरकार पुढे आज तरी कुठलाही प्रस्ताव नाही. भविष्यात असा प्रस्ताव येऊ शकतो. मात्र, आज कुठलाही प्रस्ताव राज्य सरकारकडे नाही.

तसंच मुंबईची तिसरी महानगरपालिका (BMC) करण्याचा देखील कुठलाही विचार आता नाही. नवनवीन वादाचे विषय काढू नका, आपल्याला विकासाकडे जायचं आहे असं देवेंद्र फडणवीसांनी आज स्पष्ट केलं. काल पुण्यातील एका कार्यक्रमामध्ये भाजपनेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी पुणे पालिकेच्या (PMC) विभागणीची गरज असल्याचं वक्तव्य केलं होतं याबाबत पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला असता त्यांनी वरील वक्तव्य केलं.

यावेळी बोलत असताना फडणवीसांना पत्रकारांनी ते लोकसभेत जाण्याच्या चर्चा सुरु आहेत याबाबत प्रश्न विचारला असता ते म्हणाले, मी पुण्याचा पालक मंत्री होणार नाही, पुण्याची लोकसभा ही लढवणार नाही. तुम्हाला मी महाराष्ट्रात नको आहे का? असा मिश्किल सवाल फडणवीसांनी पत्रकारांना विचारला शिवाय या फक्त माध्यमातील चर्चा असल्याचं देखील फडणवीस म्हणाले.

तसंच यावेळी मंत्री मंडळाच्या विस्ताराबाबत विचारले असता ते म्हणाले मंत्री मंडळ विस्तार लवकरच होणारं असल्याचं ते म्हणाले. आपली आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांची भेट झाली नाही. गणपतीच्या एका ठिकाणी मी पोहोचलो ते पोहोचले मात्र, आमच्या दोघांची भेट झाली नसल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Industry: कोरियन उद्योजक महाराष्ट्रात गुंतवणूक करणार; पुण्यात झाली महत्वाची बैठक, वाचा सविस्तर

Maharashtra Live News Update: पुणे-कोल्हापूरमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा तडाखा

Summer Makeup Tips: उन्हाळ्यात फ्रेश आणि ग्लोइंग लूक कसा ठेवावा? वापरा या सोप्या मेकअप टिप्स

Kalyan News : रिडेव्हलपमेंट सुरू असताना सुरक्षा भिंतीवरून वाद; दोन विकासक गटात तुंबळ हाणामारी

PAN Card Update : केवळ आधार कार्ड वापरून पॅन कार्ड बनवता येणार नाही; 'या' कागदपत्रांचीही गरज लागणार; पण कधीपासून?

SCROLL FOR NEXT