Devendra Fadnavis Saam tv
मुंबई/पुणे

Devendra Fadnavis : मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच देवेंद्र फडणवीसांचा पहिलाच महत्वाचा निर्णय, त्या फाइलवर केली सही

Devendra Fadnavis Latest News : मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच देवेंद्र फडणवीस यांनी पहिलाच महत्वाचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या फाईलवर सही केली.

Vishal Gangurde

मुंबई : महायुती सरकारचा अखेर आज गुरुवारी ५ डिसेंबर रोजी शपथविधी झाला. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदी शपथ घेतली. देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर तातडीने मंत्रालयात जाऊन कार्यभार स्वीकारला. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच देवेंद्र फडणवीस अॅक्शन मोडमध्ये असल्याचे दिसत आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी पहिलाच महत्वाचा निर्णय घेतला. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या फाईलवर सही केली.

देवेंद्र फडणवीस यांनी आझाद मैदानावर हजारो लोकांच्या उपस्थितीत मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या शपथविधीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयात जाऊन मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारला. देवेंद्र फडणवीस यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर पहिली स्वाक्षरी वैद्यकीय मदतीच्या फाईलवर केली. या फाईलवर सही करत पुण्याच्या रुग्णाला पाच लाखांची मदत सुपूर्द झाली.

मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी मुख्यमंत्र्यांनी पहिली स्वाक्षरी मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या फाईलवर केली. पुण्यातील रुग्ण चंद्रकांत शंकर कुऱ्हाडे यांना पाच लाखाची मदत मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून देण्याचे निर्देश त्यांनी फाईलवर दिले आहेत. पुण्यात राहणारे चंद्रकांत कुऱ्हाडे यांच्या पत्नीने बोन मॅरो ट्रान्सप्लांट उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून अर्थसहाय्य देण्याची विनंती केली होती.

दरम्यान, राज्याचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रशासनाला सूचना केल्या आहेत. तसेच यावेळी अधिक गतीने आणि जोमाने काम करण्यास सांगितले. जनतेच्या अपेक्षांची पूर्ती करण्यासाठी अधिक वेगाने काम करावे लागेल असे अधिकाऱ्यांना सांगितले. आता गती वाढवू आणि अधिक खोलवर जाऊन चांगले निर्णय घेऊन शाश्वत विकास कसा साध्य करता येईल, त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करूयात, असे देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mahashtra Politics : महायुतीत नाराजीनाट्य; माधुरी मिसाळांच्या बैठकीवर शिरसाटांची नाराजी, नेमकं काय घडलं? VIDEO

Ladki Bahin Yojana : लाडकीच्या पैशांवर भावांचा डल्ला, 14 हजार भावांनी लाटले तब्बल 21 कोटी

Maharashtra Politics : धनंजय मुंडे पुन्हा मंत्रीपदी? अजित पवारांनी दिले संकेत, नेमकं काय म्हणाले? VIDEO

Maharashtra Live News Update: दहशतवाद्यांना मातीत गाडण्यासाठी 'मेक इन इंडिया'ची मोठी भूमिका - PM मोदी

Rohit Pawar: धाराशिवमध्ये तयार होणारा हा तिसरा आका कोण? या आकाचा आका कोण? रोहित पवार यांचा सवाल

SCROLL FOR NEXT