Devendra Fadnavis- Chandrakant Patil  Saam TV
मुंबई/पुणे

पाटलांची 'ती' भविष्यवाणी खरी, फडणवीसांचा दुसरा 'पेन ड्राईव्ह बॉम्ब'; पाहा Video

दोन पात्र आहेत. एक आहेत, मो. अरशद खान आणि दुसरे आहेत डॉ. मुद्दस्सिर लांबे.

साम टिव्ही ब्युरो

रश्मी पुराणिक

मुंबई: विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. देवेंद्र फडणवीस यांनी पेन ड्राईव्ह बॉम्ब टाकून एकच खळबळ उडवली होती. आज देवेंद्र फडणवीसांनी सभागृहात पुन्हा एक पेन ड्राईव्ह दिला. त्यामुळे आता पुन्हा एकदा गोंधळाची परिस्थीती निर्माण झाली आहे. फडणवीसांनी अल्पसंख्यांक विभागच्या लोकांचा दाऊदशी सबंध आला तर काम देणार का? असा प्रश्न विचारला. फडणवीसांनी पेन ड्राईव्ह देवून त्यातील संभाषणाचा पाढा वाचला. मोहंमद अर्शद खान, डॉ.मुद्दस्सिर लांबे यांच्यातील हा संवाद आहे. आणि हे दोघेही waqf board चे सदस्य असल्याचं फडणवीसांनी सांगितले. त्याचबरोबर यांना नवाब मलिक यांनी नियुक्त केल्याचंही फडणवीस म्हणाले.

फडणवीसांनी आज दिलेल्या पेन डाईव्हमध्ये काय?

दोन पात्र आहेत. एक आहेत, मो. अरशद खान आणि दुसरे आहेत डॉ. मुद्दस्सिर लांबे.

संवाद : सलामवालेकूम

डॉ. लांबे : मेरा प्रॉब्लेम क्या है मालूम... मेरे ससूर दाऊद कें राईट हँड थे पहले और मेरा रिश्ता जो हसिना आपा ने कराई थी. मेरे तरफ से सोहेल भाई थे और वहाँ सें हसिना आपा थी. हसिना आपा याने दारुद की बहन. हसिना आपा और साथ में इक्बाल कासकर की वाईफ. याने दाऊद की भाभी. जरा भी कुछ हुआ तो बात वहाँ तक पहुँचती है.

अर्शद खान : तुमने उनके साथ अन्वर का नाम तो सुना होगा. वो मेरे चाचा है. वो भी उनके साथ ही रहते थे. मतलब स्टार्ट सें रहते थे. अभी इंतकाल हुआ उनका.

डॉ. लांबे : मेरा ससूर पुरा कोकण बेल्ट संभालते थे, ब्लॅक बेल्ट थे और पुरा वही संभालते.

अर्शद खान : अच्छा. बॉम्बे में मेरे चाचा थे और पुरा संभालते थे. जब मै मदनपुरा में था. भेंडी बाजार में मेरी पैदाईश है.

डॉ. लांबे : मेरे घर में कोई मसला होता है तो वहाँ तक पहुचता है. सिधी बात सोहेल भाई तक पहुंचती है. अभी चार-पास दिन सें मेंरे घर में मसला चल रहा है. लगता है की, अपनी आप की जान देने जैसा है.

अर्शद खान : इसलिए मैने पुछा सही सही तेरी कहानी क्या, तो बोली कुछ नही मेरा अपना टेंशन है.

डॉ. लांबे : अर्शद मै तो बोलता हु की, तुम अभी तुम अभी वकफ के काम पकडो. अभी अपने पास पॉवर है. अभी तुम चाहे जितना पैसा कमा सकते हो. पुरे वकफ के काम शुरू करो. कमाने का सेंटिंग करो. तुम्हारा आधा और मेरा आधा

अर्शद खान : अभी मै बैठुंगा और तुमसे पर्सनली ये सब चीज में बैठुंगा. अपना एक बंदा ले के आऊंगा और काम पकडुंगा.

डॉ. लांबे : मेरे माहीम में कैसा होता मालूम है क्या, मेरे साथ क्या हुआ तो पुरे लोग साथ में आते है.

अर्शद खान: अर्शद के नाम सें बिल्डींग ले. अर्शद मेरा भरोसे का आदमी है. कई पलटी नही मारेगा.

डॉ. लांबे : तुम्हारे उपर इनक्वायरी बैठ सकती है, लेकिन मेरे पर नही बैठ सकती

असा काहीसा संवाद फडणवीसांनी दिलेल्या पेन डाईव्हमध्ये आहे. एक मुलीने डॉ. लांबे यांच्यावर बलात्काराचा आरोप केला आहे. मग त्यांनी लग्न करण्याचे आश्वासन दिले. या महिलेच्या पतीने घटस्फोट दिला. डॉ.लांबे ह्यांनी या महिलेच्या पती विरोधात चोरीची तक्रार केली तो तुरुंगात असल्याचं फडणवीसांनी सभागृहात सांगितले. Waqf board मध्ये पैसे कसे कमवायचे अशी चर्चा झालेली आहे. हसीना पारकर, दाऊद यांच्यासोबतचे संबंध Waqf board member सांगतो हे लाजीरवाणं असल्याचं फडणवीस म्हणाले.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: रायगडच्या पायथ्याशी जोरदार पाऊस

Healthy liver color: निरोगी लिव्हरचा रंग कसा असतो?

Mumbai Rain: मुंबईत कोसळधार! चेंबूरमध्ये पालिका रुग्णालयाबाहेर ४ फुटांपर्यंत पाणी, रुग्णांना खांद्यावरून नेण्याची वेळ; पाहा VIDEO

Big Boss 19: 'बिग बॉस १९'च्या घरात 'गँग्स ऑफ वासेपूर'च्या अभिनेत्याची एन्ट्री; हे १२ जणांच्या नावावर शिक्कामोर्तब

Red Carpet: फक्त सेलिब्रिटी किंवा खास लोकांचे स्वागत करण्यासाठीच रेड कार्पेट का घालतो?

SCROLL FOR NEXT