Devendra Fadnavis  Saam tv
मुंबई/पुणे

Devendra Fadnavis : ठाकरेंनी शिंदेंना सीएमपदाचा शब्द दिला होता; देवेंद्र फडणवीसांचा मोठा दावा

Devendra Fadnavis interview : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदावरून मोठा दावा केला आहे. उद्धव ठाकरे यांनी २०१९ सालच्या निवडणुकीत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाचा शब्द दिला होता, असा दावा फडणवीसांनी केला आहे.

Vishal Gangurde

मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदावरून मोठा दावा केला आहे. उद्धव ठाकरे यांनी २०१९ सालच्या निवडणुकीत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाचा शब्द दिला होता. शिंदे हे ७ ते ८ तासांसाठी मुख्यमंत्री झाले होते. शिंदे यांच्या घरात सुरक्षा देखील तैनात केली होती, असा दावा उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी 'टाइम्स ऑफ इंडिया'ला दिलेल्या मुलाखतीत केला आहे.

देवेंद्र फडणवीसांनी काय दावा केला?

देवेंद्र फडणवीसांनी दावा करताना म्हटलं की, 'एकनाथ शिंदे हे पक्षासाठी नेहमी एकनिष्ठ राहिले आहेत. मात्र, ठाकरे हे कट्टर हिंदुत्वाकडून काँग्रेसकडे झुकले. आदित्य ठाकरे यांना मोठं करण्यासाठी शिंदे यांचे पंख कापायला सुरुवात केली होती'.

'२०१९ सालच्या विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांनी नेतृत्व केलं होतं. त्यांना मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला होता. ते ७ ते ८ तासांसाठी मुख्यमंत्री झाले होते. त्यांच्या घराला सुरक्षा प्रदान केली होती. मात्र, त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी स्वत: मुख्यमंत्री होण्याचा निर्णय घेतला. पुढे राजकीय अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाल्याने शिंदेंनी बंड केलं, असा दावा फडणवीसांनी केला.

मराठी मते कोणासोबत आहेत, या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) सांगितलं की, 'मराठी मते फक्त ठाकरेंसोबत आहेत, हे मिथक आहे. आम्ही २०१७ च्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत ८२ वॉर्ड जिंकले. तर ते ८४ वॉर्डमध्ये जिंकले. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत आम्ही वेगवेगळे लढलो, त्यावेळी आम्ही शिवसेनेपेक्षा अधिकच्या जागा जिंकल्या. मी सुद्धा मराठी आहे. तसेच आशिष शेलार देखील मराठी आहेत. लोक आम्हाला वारंवार मते देत आहेत. मोदींची प्रसिद्धी ही भाषा आणि जातीच्या पलीकडे आहे'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai : मुंबईमध्ये जोरदार राडा, भाजप कार्यकर्त्यांना बेदम मारहाण, डोक्यावर भयंकर वार, व्हिडिओ व्हायरल

Bihar Bhawan: मुंबईत तयार होणार बिहार भवन, ३० मजली इमारतीसाठी ३१४ कोटींचा खर्च; फायदा नेमका कुणाला होणार?

Maharashtra Live News Update: चांदीचा भाव प्रति किलो 3 लाख 4 हजार रुपये; ग्राहकांच्या खिशाला फटका

High Cholesterol Symptoms: सावधान! थंडीत ही 5 लक्षणे अजिबात दुर्लक्षित करु नका, असू शकतो उच्च कोलेस्ट्रॉलचा धोका

Pune Satara Highway: पुणे सातारा प्रवास सुसाट होणार! ४५ मिनिटे वाचणार; सरकारचा मास्टरप्लान

SCROLL FOR NEXT