मुंबई : शिवसंपर्क अभियानाअंतर्गत मुंबईच्या बीकेसी मैदानात शिवसेनेची तोफ धडाडली. या सभेत मंत्री गुलाबराव पाटील, एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे, संजय राऊत (Sanjay Raut) यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. या सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनीही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, केंद्र सरकारवर हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून कडाडून टीका केली. ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांवरही जोरदार टीकास्त्र सोडलं. 'विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना बुलेट ट्रेनच्या मुद्द्यावरून मुंबईला स्वतंत्र्य करायची आहे, असा आरोप देखील उद्धव ठाकरेंनी फडणवीसांवर केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या सभेवरील टीकेला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत पहिली प्रतिक्रिया दिली आहे. (Devendra Fadnavis on CM Uddhav Thackeray Speech )
हे देखील पाहा -
शिवसेनेची शिवसंपर्क अभियानाअंतर्गत बीकेसी मैदानात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सभा झाली. उद्धव ठाकरे यांनी भाजप नेत्यांवर जोरदार टीकास्त्र सोडलं. उद्धव ठाकरेंच्या सभेनंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या सभेत उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर बाबरी मशिद, अयोध्याच्या मुद्यावरून जोरदार टीकास्त्र सोडलं. तसेच ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना मुंबई स्वतंत्र्य करायची आहे, असा आरोप देखील केला. या आरोपावर भाजपकडून फडणवीसांनी ट्विट करत पहिली प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'सर्वत्र पळापळ अन् गदारोळ,नागरिक भयभीत अन् विरोधक दहशतीत, सर्वत्र सन्नाटा अन् लोक घामाघूम... अरे छट हा तर निघाला... आणखी एक ‘टोमणे बॉम्ब’...जवाब मिलेगा और ठोक के मिलेगा' अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिले आहे. देवेंद्र फडणवीसांच्या प्रतिक्रियेवर शिवसेनेकडून काय प्रत्युत्तर मिळतंय, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
काय म्हणाले होते उद्धव ठाकरे ?
उद्धव ठाकरे म्हणाले होते, 'ते म्हणतात बाबरीच्या वेळेला शिवसैनिक नव्हतेच. मी गेलो होतो म्हणे तिकडे.अरे तुमचं वय काय ? शाळेच्या सहलीला गेला होतात ?चला चला अयोध्येला चला, बाबरी बघायला चला. तुम्ही खरच तिथे गेला असता आणि वर चढला असता तर तुमच्या वजनाने बाबरी खाली आली असती', अशी जोरदार टीका उद्धव ठाकरेंवर केली होती. तसेच उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांच्या मुंबईला स्वतंत्र्य करू, या विधानावरूनही टीकास्त्र सोडलं.
Edited By - Vishal Gangurde
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.