Devendra fadnavis meets aaditya thackeray : Saam tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics : आताची सर्वात मोठी बातमी; देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरेंची एकाच हॉटेलमध्ये भेट? राजकीय चर्चांना उधाण

Devendra fadnavis meets aaditya thackeray : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे यांची एका हॉटेलमध्ये भेट झाल्याची माहिती मिळाली आहे.

Vishal Gangurde

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी हाती आली आहे. मुंबईच्या बीकेसीतील सॉफिटेल हॉटेलमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे आल्याची माहिती मिळाली आहे. दोघांची एकाच हॉटेलमध्ये भेट झाल्याचं सांगण्यात आलं आहे. दोघांची हॉटेलच्या सातव्या मजल्यावर भेट झाली. या भेटीत दोघांची नेमकी काय चर्चा झाली, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र, दोघांच्या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मिश्किलपणे उद्धव ठाकरे यांना राजकीय ऑफर दिली होती. उद्धवजी तुम्हाला इकडे येण्याचा स्कोप असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरे यांना म्हटलं होतं. त्यानंतर आदित्य ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांची भेट झाली होती. त्यावेळी 'ऑफर दिली, स्वागताला आलो, असं मिश्किलपणे आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना म्हटलं होतं. दोन्ही नेत्यांच्या वक्तव्याने राजकीय घडामोडींना वेग आला होता. अधिवेशन संपल्यानंतर आज शनिवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे यांच्या हॉटेलमधील भेटीला राजकीय महत्व प्राप्त झालं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बीकेसीतील सॉफिटेल हॉटेलमध्ये मुख्यमंत्री फडणवीस आणि आदित्य ठाकरे यांच्यामध्ये बराच वेळ चर्चा झाली. आज शनिवारी सांयकाळी साडेपाच वाजता आदित्य ठाकरे हॉटेलमध्ये आले होते. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हॉटेलमध्ये पोहोचले. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी मिश्किलपणे उद्धव ठाकरेंना ऑफर दिली होती. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट झाली होती. दोघांची जवळपास अर्धा चर्चा झाली होती. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाची निवडणूक आणि आगामी काळात कोणत्याही राजकीय घडामोडी घडतील का, याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. त्यात एकनाथ शिंदे नाराज असल्याची देखील चर्चा आहे . काही दिवसांपूर्वी शिंदेंची दिल्लीवारी झाली होती. त्यानंतर आज आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली आहे. दोघांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. मात्र, भाजपच्या सूत्रांनी दोघांची हॉटेलच्या सातव्या मजल्यावर भेट झाल्याचं वृत्त फेटाळलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sameer Wankhede VS Aryan Khan: समीर वानखेडेंना दिल्ली हाय कोर्टचा दणका, शाहरुखचा मुलगा आर्यनला दिलासा, काय घडलं?

हिवाळ्यात गरम पाण्यात आंघोळ केल्याने हाडे कमकुवत होतात का?

Ajit Pawar Plane Crash: ....तर असं काही घडलंच नसतं; अजित पवारांचे ड्रायव्हर श्यामराम मनवे असे का म्हणाले?

Nashik : मुंबईच्या दिशेने घोंघावत आलेलं 'लाल वादळ' वेशीवरच थांबलं!

Nails Cutting Tips: नखे कापण्याची योग्य पद्धत कोणती?

SCROLL FOR NEXT