मुंबई/पुणे

Devendra Fadnavis: मोठी बातमी : लोकसभेच्या निकालापूर्वी शिवतिर्थावर खलबतं; देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंच्या भेटीला

Devendra Fadnavis Meet Raj Thackeray : देवेंद्र फडणवीस राज ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवतीर्थावर पोहोचले आहेत. उद्या येणाऱ्या निकालाच्या पार्श्वभूमीवर आजची भेट महत्त्वाची आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वैदेही काणेकर, साम प्रतिनिधी

मुंबई : लोकसभा निवडणुकीचे निकाल येण्यासाठी काही तास उरलेत. त्याचदरम्यान एक मोठी बातमी समोर आलीय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतलीय. निकालाआधी दोन्ही नेत्यांची भेट होत असल्याने अनेकांच्या नजरा या भेटीकडे लागलेत.

देवेंद्र फडणवीस यांची ही भेट सदिच्छा असल्याचं म्हटलं जातं आहे. पण लोकसभा निवडणुकीचा निकाल आणि त्यानंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुका आणि तोंडावर आलेल्या शिक्षक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका पाहता ही भेट महत्त्वाची मानली जातेय.

फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या भेटी मागे सर्वात पहिलं कारण हे पदवीधर मतदारसंघाची निवडणूक असल्याचं म्हटलं जात आहे. कोकण पदवीधर मतदारसंघासाठी मनसेनं अभिजीत पानसे यांना उमेदवारी दिलीय. तर दुसरीकडे भाजपकडून निरंजन डावखरे यांना उमेदवारी देण्यात आलीय. डावखरे हे देवेंद्र फडणवीसांच्या जवळचे मानले जातात.

यासंदर्भातही फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यात चर्चा होऊ शकते. दुसरं कारण हे लोकसभा निवडणुकीच्या आधीच गणित, लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतरचे गणित, विधान परिषद तसेच पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका याबाबत दोघात चर्चा होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cancer Symptoms: सावधान! झोपल्यावर प्रचंड घाम येतोय?असू शकतं कॅन्सरचं लक्षण

Maharashtra Politics: नाशिकमध्ये मविआला खिंडार! अनेक बड्या नेत्यांनी सोडली साथ, भाजपच्या 'ऑपरेशन लोटस'ला यश

MPSC विद्यार्थिनीला लग्नाचं खोटं वचन; उद्योगपतीकडून वारंवार शारीरिक संबंध, बारामतीत नेमकं काय घडलं?

Maharashtra Live News Update: खोट्या मतदार यादीविरोधात शिवसेना ठाकरे गटाचा उद्या मुंबईत मोर्चा

सलमान खानच्या 'Bigg Boss 19'मध्ये दिसणार 'नागिन'ची पहिली झलक, 'ही' अभिनेत्री साकारणार मुख्य भूमिका

SCROLL FOR NEXT