devendra fadnavis  Saam Tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics : 'ते' पुन्हा येणार! देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार? नवी तारीख आली समोर

Maharashtra Political News : देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या शपथविधी सोहळ्याची तारीख देखील सूत्रांनी सांगितली आहे.

Vishal Gangurde

गणेश कवडे, साम टीव्ही

मुंबई : महायुतीच्या नेत्यांनी गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्रिपद आणि सत्तावाटपासाठी बैठकांचा सपाटा लावला आहे. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार, याकडे साऱ्या देशाचं लक्ष लागलं आहे. एकीकडे एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाचा दावा सोडल्याचं बोललं जात आहे. त्यानंतर महायुतीच्या गोटातून मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांचं नाव समोर आलं आहे. या नव्या सरकारच्या शपथविधीची तारीखही समोर आली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महायुतीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा अखेर ठरला आहे. देवेंद्र फडणवीस ५ डिंसेबर रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. आझाद मैदानावर ५ डिसेंबर रोजी देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. महायुतीच्या नेत्यांचा एकमुखाने निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.

मुंबईतील वेगवेगळ्या मैदानाची चाचपणी महायुतीकडून सुरु होती. शिवाजी पार्कवर ६ डिसेंबर महापरिनिर्वाण दिनानिमित्त लाखो आंबेडकरी अनुयायी शिवाजी पार्कवर येतात. त्यांच्यासाठी विशेष सोय शासनाकडून करण्यात आली आहे. तर आझाद मैदानावरही एका कार्यक्रमाचं आयोजन २ डिसेंबर रोजी आहे. मात्र, आझाद मैदानावरील हा कार्यक्रम ५ डिसेंबर आधी समाप्त होणार आहे. त्यामुळे ५ डिसेंबर रोजी महायुती सरकारचा शपथविधी होण्याची शक्यता आहे.

या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, अनेक राज्यातील मुख्यमंत्री या शपथविधीला येण्याची शक्यता आहे. अनेक सेलिब्रिटी देखील येणार आहे. तसेच काही महंत देखील हजेरी लावणार आहे. या सर्वांचा विचार करून आझाद मैदानाची निवड केल्याची माहिती मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT