श्रीगुरु बालाजी तांबेंच्या निधनाने ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व हरपले: देवेंद्र फडणवीस  Saam Tv
मुंबई/पुणे

श्रीगुरु बालाजी तांबेंच्या निधनाने ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व हरपले: देवेंद्र फडणवीस

बालाजी तांबे यांच्याशी माझा वैयक्तिक स्नेह होता.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई १० ऑगस्ट: आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांच्या निधनाचे वृत्त ऐकून अतिशय वाईट वाटले. त्यांच्या निधनाने एक ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व हरपले आहे, अशी शोकसंवेदना माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.

बालाजी तांबे यांच्याशी माझा वैयक्तिक स्नेह होता. आयुर्वेद आणि प्राचीन भारतीय चिकित्सा पद्धती यावरील अभ्यास आणि संशोधनात त्यांनी दिलेले योगदान अतुलनीय असेच आहे.

बालाजी तांबे यांनी आयुर्वेद आणि अध्यात्म यावर अतिशय विपुल लेखन केले आणि विविध भाषांमध्ये त्याचा अनुवाद झाला. विशेषत: स्त्रियांच्या आरोग्य क्षेत्रात सुद्धा त्यांनी मोठे काम केले. योग, संगीतोपचार असे विविध प्रयोग त्यांनी केले. त्यांचे माध्यमांतील लेख वा मुलाखती या विचारप्रवर्तक असायच्या आणि म्हणूनच त्या लोकप्रिय ठरल्या. श्रोत्याला त्या मानसिक समाधान-आधार देणार्‍या असायच्या. मी बालाजी तांबे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात आम्ही सारे सहभागी आहोत, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Plane Crash: प्रशिक्षणादरम्यान विमान कोसळलं, २ भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू

Maharashtra News Live Update: डिजिटल पेमेंटवर लागणाऱ्या MDR शुल्कातून पेट्रोलपंपांना वगळा, CIPD ची मागणी

7 Grain Bhakri: वजन कमी आणि शुगर कंट्रोल करण्यासाठी रोज खा ७ धान्यांची भाकरी; मिळताता हे आरोग्यादायी फायदे

Happy Married Life Tips: नवरा-बायकोमधील सततची भांडणे मिटवण्यासाठी ‘या’ ५ सोप्या गोष्टींची मदत घ्या; संसारात राहील गोडवा

BP अचानक वाढतोय? सकाळी ही 6 पेये ठरतील फायदेशीर

SCROLL FOR NEXT