Devendra Fadnavis In Mumbai saam tv
मुंबई/पुणे

Devendra Fadnavis News: देवेंद्र फडणवीसच मुंबईचे हृदयसम्राट; भाजपच्या बड्या नेत्याचं विधान

Devendra Fadnavis Latest News: बोरिवली येथील मागाठाणे येथील एका कार्यक्रमात शेलार यांनी फडणवीसांचं कौतुक करताना हे विधान केलं आहे.

Satish Daud

Ashish Shelar on Devendra Fadnavis

भाजप नेते आशिष शेलार यांनी एक मोठं विधान केलं आहे. मुंबईचे हृदयसम्राट कोणी असेल तर ते देवेंद्र फडणवीस आहेत, असं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे. बोरिवली येथील मागाठाणे येथील एका कार्यक्रमात शेलार यांनी फडणवीसांचं कौतुक करताना हे विधान केलं आहे. त्यांच्या या विधानाची चांगलीच चर्चा रंगली आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

राजमाता जिजाऊ माँ साहेब यांच्या जयंतीच्या (१२ जानेवारी) पूर्वसंध्येला बोरिवली येथील मागाठाणे येथे राजमाता जिजाऊ चौकाचे लोकार्पण करण्यात आले. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती होती. (Latest Marathi News)

काय म्हणाले आशिष शेलार?

कार्यक्रमात भाषण करताना आशिष शेलार यांनी मुंबईच्या विकासकामावरून देवेंद्र फडणवीसांवर स्तुतीसुमनं उधळली. मुंबईच्या विकासाच्या इतिहासाची पार्श्वभूमी पाहिली तर खऱ्या अर्थाने मुंबई हृदयसम्राट कोणी असेल तर ते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आहेत, असं आशिष शेलार म्हणाले.

मुंबईतील वाहतुकीची समस्या टाळण्यासाठी ९ मेट्रो रुळ कोणी केले? मुंबईचा कोस्टल रोड कोणी केला? मुंबईच्या रेल्वेच्या प्लॅटफॉर्मची उंची कोणी वाढवली? मुंबईच्या प्रॉपर्टी टॅक्समध्ये सूट कोणी दिली? पाणी टॅक्समध्ये सूट कोणी दिली?

एसआरएमध्ये अडकलेल्या लोकांना दिलासा कोणी दिला? असे अनेक प्रश्न आशिष शेलारांनी उपस्थितांना विचारले. त्यावेळी सर्वांनी देवेंद्र फडणवीस असा नामघोष केला. उपस्थितांचा जयघोष पाहता देवेंद्र फडणवीस मुंबई हृदय सम्राट आहेत, असं आशिष शेलार म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आई होण्याचं योग्य वय कोणतं मानलं जातं?

Maharashtra Rain Live News : जुन्या कसारा घाटात जव्हार फाट्याजवळ दरड कोसळली

Visapur Fort History: महाराष्ट्रातील ऐतिहासिक किल्ल्यांपैकी विसापूर किल्ल्याचा इतिहास आणि वैशिष्ट्ये

Kalyan Rain : उल्हास नदीला पूर; पुलावरून पाणी वाहत असल्याने महामार्ग वाहतुकीस बंद

Highest egg consumption: कोणत्या देशात सर्वाधिक अंडी खाल्ली जातात?

SCROLL FOR NEXT