Uddhav Thackeray, Devendra Fadnavis Saam TV
मुंबई/पुणे

महाराष्ट्रातील सरकार अक्कलशुन्य; फडणवीस सरकारवर बरसले

मविआ सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? माहिती अधिकारात फाईलचे निरीक्षण करण्यासाठी गेले तर त्यासाठी थेट माहिती मागणार्‍यालाच नोटीस!

साम टिव्ही ब्युरो

सुशांत सावंत

मुंबई: किरीट सोमय्या गेल्या अनेक दिवसांपासून ठाकरे सरकारमधील मंत्र्यांचे घोटाळे बाहेर काढत आहेत. काल किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी चक्क मंत्रालयात जाऊन फाईल तपासल्याने खळबळ उडाली होती. मंत्रालयातील नगर विकास खात्याच्या कार्यालयात जाऊन किरीट सोमय्या काही फाईली तपासत असल्याचे फोटो व्हायरल झाले होते. मंत्रालयात जाऊन त्यांनी शासकीय कर्मचाऱ्यांच्या खुर्चीवर बसून फाईल बघितल्या मुळे. सोमाय्या यांनी कुठल्या अधिकारात फाईल बघितल्या तसेच अधिकार्‍यांनी कोणत्या अधिकारात फाईल दाखवल्या याबाबत चर्चा मंत्रालयात सुरू होती. त्यावरच आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उत्तर देत सरकारवर ताशेरे ओढले आहेत.

मविआ सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? माहिती अधिकारात फाईलचे निरीक्षण करण्यासाठी गेले तर त्यासाठी थेट माहिती मागणार्‍यालाच नोटीस! या अक्कलशून्य सरकारने संपूर्ण लोकशाहीच पायदळी तुडविली आहे. किरीट सोमय्यांना नोटीस कसली देता, ही नोटीस द्यायला सांगणार्‍यांचा बोलवित्या धन्यावर कारवाई करा! मंत्रालयातील प्रत्येक विभागात सीसीटीव्ही आहेत. हे फोटो कुणी काढले हे जरी शोधले तरी ते प्रसारित कुणी केले, हे सहज स्पष्ट होईल. पण, महाविकास सरकारचे डोके नेहमी उलटेच चालते.

सरकारी कर्तव्य बजावणार्‍या कर्मचार्‍यांना सुद्धा नोटीसा! हाच का तुमचा पारदर्शी कारभार? शासनाच्या कार्यालयात जाऊन माहिती अधिकारात माहिती मागणे, फाईलचे निरीक्षण करणे, हा अधिकार सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी दीर्घ लढ्यानंतर सर्वसामान्यांना उपलब्ध करून दिला. एखादी प्रक्रिया माहिती नसेल तर ती जाणून घ्या. केवळ हुकूम सोडून कारवाई कसली करता? असे ट्विट करत फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. आणि सोमय्या यांनी माहिती अधिकारात फाईली तपासल्या असल्याचेही त्यांनी सांगितले.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eknath shinde: समोर अमित शाह, एकनाथ शिंदेंकडून 'जय गुजरातची' घोषणा|VIDEO

Eknath Shinde : जय गुजरात; एकनाथ शिंदेंची पुण्यात अमित शहांसमोरच घोषणा

Govindwadi Bypass Bridge : ६ वर्षांतच पुलाची दैना; कल्याणच्या गोविंदवाडी बायपास पुलाच्या कोट्यवधींच्या कामावर प्रश्नचिन्ह

Monsoon Hair Care: पावसाळ्यात केस गळण्याची समस्या? 'या' टिप्सने घ्या केसांची योग्य काळजी

मराठमोळ्या ठसक्यात तरुणीचा जोरदार डान्स; 'चाळ माझ्या पायांत' गाण्यावर दिला धमाकेदार परफॉर्मन्स

SCROLL FOR NEXT