देवेंद्र फडणवीस यांनी भाजप नेत्याच्या चिमुकलीचा हट्ट अखेर पुरवला...(पहा व्हिडिओ) Saam Tv
मुंबई/पुणे

देवेंद्र फडणवीस यांनी भाजप नेत्याच्या चिमुकलीचा हट्ट अखेर पुरवला...(पहा व्हिडिओ)

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे खूपच सक्रीय आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे खूपच सक्रीय आहेत. पक्षाच्या बैठका असू दे किंवा सोशल मीडिया. देवेंद्र फडणवीस नेहमीच अॅक्टिव्ह राहत असतात. गुरुवारी कोकण विभागात भाजपच्या जिल्हा आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस उपस्थित होते आणि या बैठकी दरम्यान एक वेगळे चित्र सर्वांना बघायला मिळाले आहे.

हे चित्र बघून सर्वांच्याच चेहऱ्यावर हास्य बघायला मिळाले आहे. नेमकं घडलं असं की, कोकण विभागात भाजपची जिल्हा आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक होती आणि त्याकरिता सर्व पदाधिकाऱ्यांना उपस्थित राहण्यास सांगितले होते. त्यानुसार दापोलीचे उपाध्यक्ष केदार साठे यांना देखील या बैठकीला निमंत्रित करण्यात आले होते.

हे देखील पहा-

मात्र, त्या दिवशी केदार साठे यांच्या चिमुकलीचा वाढदिवस होता. आपल्या वाढदिवसाच्या दिवशी पप्पांनी घराबाहेर न जावे याकरिता त्यांच्या मुलीने एक अटच त्यांच्यापुढे ठेवली होती. आपल्या वाढदिवसाला पप्पांनी घरीचं थांबावे, असे चिमुकलीला वाटत होते. मात्र, बैठकीला उपस्थिती देखील आवश्यक होती. प्रचितीचा वाढदिवस असल्याने तिने पप्पांना बैठकीला जाऊ नका असा हट्ट कायम धरला होता. पक्षाची बैठक महत्त्वाची आहे.

त्यामुळे त्यांनी मुलीची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण प्रचितीने हट्ट काय सोडला नाही. यावेळी मुलीनेही त्यांच्यापुढे एक अट ठेवत म्हटले की, "तुम्ही जर देवेंद्र फडणवीस काकांकडून मला हॅप्पी बर्थडेचा फोन करणार असाल तरच बैठकीला जा, नाहीतर जाऊ नका". मुलीने ठेवलेली ही अट पूर्ण करण्याचे आश्वासन केदार साठे यांनी दिले आणि ते बैठकीला निघून गेले. बैठक पार पडल्यावर केदार साठे यांनी हा प्रकार देवेंद्र फडणवीस याच्या कानावर टाकला.

त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनीही केदार साठे यांच्या मुलीचा हट्ट पुरवण्याचा निर्णय घेतला आणि तिला थेट व्हिडीओ कॉल करण्यात आला आहे. हॅप्पी बर्थडे असे देवेंद्र फडणवीसांनी म्हटले त्यावर केदार यांच्या मुलीने थँक्यू म्हटले आहे. तसेच माजी उद्यापासून शाळा सुरू होत आहे. मी शाळेत जाणार आहे. शाळा सुरू व्हायला हवी असे मला वाटतं नाही. यावर देवेंद्र फडणवीस यांनी तिला गुड गर्ल असे देखील म्हटले आहे. यावेळी केदार यांच्या मुलीने देवेंद्र फडणवीस यांना गुलाबजाम खाण्याचे देखील आमंत्रण ही दिले आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Crime: साताऱ्यानंतर बदलापुरात खळबळ; डॉक्टर महिलेवर प्राणघातक हल्ला

Maharashtra Live News Update: महाडमध्ये रेल्वे यावे या मागणीसाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमरण उपोषण

India vs Australia: ऐन रंगात आलेल्या मॅचमध्ये पावसाचा व्यत्यय; वरुणराजाच्या गोंधळानं पहिल्या टी२० सामना रद्द

Shocking: लॉजमध्ये हाई वोल्टेज ड्रामा! नवऱ्याला गर्लफ्रेंडसोबत आक्षेपार्ह स्थितीत रंगेहाथ पकडलं, बायकोने चपलेनं चोपलं; VIDEO व्हायरल

गर्ल्स हॉस्टेलमध्ये वापरलेल्या कंडोमचा खच; घटनेमागचं सत्य काय? 'हा' व्हिडिओ नेमका कुठला?

SCROLL FOR NEXT