ajit pawar  saam tv
मुंबई/पुणे

शिंदे-फडणवीस सरकार कधीपर्यंत राहिल? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचे काल खाते वाटप झाले.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई: शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळचा विस्तार झाला, काल या मंत्र्यांचे खातेवाटपही झाले. यावरुन आता आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरू आहेत. खातेवाटपावर आता विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली. महाराष्ट्र राज्याचा कुठल्याही खात्याचा मंत्री होणे महत्त्वाची गोष्ट आहे, वजनदार खाती तुमच्या भाषेत असतात. माझ्यासाठी सर्व खाते समसमान आहेत, आणि जर एखाद्या माणसाची कुवत नसेल आणि त्याला जर मलाईदार खाते मिळाले तर ते खातच योग्य पद्धतीने चालणार नाही, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिली.

'जोपर्यंत १४५ चा बहुमताचा आकडा आहे, तोपर्यंत हे सरकार राहिल. आमचे सरकार असताना सांगितले जात होते की, २५ वर्षांचे हे सरकार राहील. कार्यकर्त्यांना खुष करण्यासाठी असे बोलावे लागते. पण कोणीही ताम्रपट घेऊन आलेले नाही हे लक्षात ठेवावे. बहुमता मधला एक आकडा जरी कमी झाला तरी सरकार कोसळू शकते, असंही अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले.

यावेळी अजित पवार यांनी सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या 'वंदे मातरम' या घोषणेवर प्रतिक्रिया दिली. सांस्कृतिक मंत्री म्हणून सुधीर मुनगंटीवार यांनी वंदे मातरम बोलण्यासाठी घोषणा केली आहे. पण ठाकरे सरकार असताना त्यावेळेस जय महाराष्ट्र हे फोन केल्यावर वापरले जायचे. नवीन सरकार आल्यानंतर आता वंदे मातरम बोलले जात आहे. आम्ही सभागृहात विचारू की वंदे मातरम कशासाठी वापरले जात आहे. जर योग्य असेलतर त्याला विरोध करण्याचे कारण नाही, असंही अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केलेल्या भ्रष्टाचाराच्या संदर्भात बोलताना अझित पवार म्हणाले, भ्रष्टाचार हा कुणालाही नको आहे. पंतप्रधान असतील किंवा कुठलाही नागरिक असेल देशातला भ्रष्टाचार करणेच अयोग्य आहे, असंही अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Shreyas Iyer: ‘योग्य वेळ आली की तो राज्य करेल’, वैभव सूर्यवंशीच्या भवितव्याबाबत श्रेयस अय्यरचा मोठा विश्वास

Pune News: माझ्या बॉयफ्रेंडला एड्स आहे, तरी मी त्याच्याशीच लग्न करणार, पुण्यामध्ये कॉलेजला गेलेली २२ वर्षीय तरुणी बेपत्ता

PM Kisan Yojana : पीएम किसानचा २००० रुपयांचा हप्ता खात्यात येण्याआधी 'हे' नक्की तपासा, अन्यथा अडू शकतो हप्ता

October Heat : ऑक्टोबरच्या उकाड्यामुळे किडनी होते खराब, 'ही' ५ गंभीर लक्षणे दिसताच व्हा सावध!

SCROLL FOR NEXT