Devendra Fadnavis latest Marathi news, Devendra Fadnavis News, BJP News, Devendra Fadnavis on Uddhav Thackeray  Saam TV
मुंबई/पुणे

पटाेले, अजित पवार, मुख्यमंत्री ठाकरे देतील 'या' प्रश्नाचे उत्तर : फडणवीस

भाजपा महाराष्ट्र 'प्रदेश कार्यसमिती' बैठकीत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

Siddharth Latkar

मुंबई : केंद्र सरकारमुळे पेट्राेल (petrol) डिझेलची किंमत (petrol price) कमी झाली आहे. महाराष्ट्र सरकारने (maharashtra government) इंधनावरील कर कमी केलेला नाही. हे सरकार मे महिन्यात एप्रिल फूल बनविण्याचे काम करीत आहे. सध्या राज्यात इंधनावर 29 रुपये कर आहे तर केंद्राचा 19 रुपये कर आहे. त्यामुळे वाढत्या महागाईचा भार काेणामुळे आहे हे जनतेत जाऊन सांगा असे भाजप कार्यकर्त्यांना विराेधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आवाहन केले. (Devendra Fadnavis latest marathi news)

भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यसमिती बैठकीत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस बाेलत हाेते. फडणवीस (devendra fadnavis) म्हणाले दाेन वेळा पंतप्रधान नरेंद्र माेदींनी (narendra modi) पेट्राेल आणि डिझेलवरी अबकारी कर कमी केला. हे करीत असताना केंद्र सरकराला दाेन लाख 20 हजार काेटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे. परंतु पंतप्रधान माेदींनी सामान्य माणूस केंद्रस्थानी धरुन हा धाडसी निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्रातील जनतेला देखील दिलासा मिळाला आहे.

महाराष्ट्राचे सरकार मे महिन्यात एप्रिल फुल बनविण्याचे काम करीत आहे. केंद्राने दहा रुपयांचा कर कमी केल्यानंतर आपाेपाच राज्यातील इंधन दर कमी झाला आहे. त्यामुळे अनायसे पडाे आणि दंडवत घडाे अशी स्थिती झाली असताना हे सरकार दीड दाेन रुपये कमी केल्याचे सांगत आहे. खरंतर नाना पटाेले, अजित पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राेज पेट्राेल डिझेल दरावर टाहाे फाेडत हाेते. आता ते राज्यातील कर कधी कमी करणार असा प्रश्न फडणवीस यांनी विचारला आहे.

महागाई काेणामुळे आहे ते जनता समजून जाईल. एवढी बेशरम लाेक मी पाहिली नाही. भाजप कार्यकर्त्यांनी पेट्राेल डिझेलच्या भावावर जी काय महागाई आहे ती केवळ महाराष्ट्र सरकारमुळे आहे. त्यामुळे या सरकारच्या विराेधात एल्गार पुकारले पाहिजे, आंदाेलन केले पाहिजे. या खाेटारड्या लाेकांना आपण उघडे पाडले पाहिजे असे फडणवीस यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Panvel Tourism : लोणावळा खंडाळा कशाला? पनवेलमध्येच पाहा मनाला भुरळ घालणारा अडाई धबधबा

Amit and Aaditya Thackeray: ठाकरेंची तिसरी पिढी राजकरणात; अमित अन् आदित्य ठाकरेंचे ते फोटो चर्चेत

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्र्यांकडून माऊलींच्या पादुकांचे पूजन; पालखीला दिला खांदा

Tamarind Leaf Recipe: चिंचेच्या पानांची अस्सल गावरान भाजी, एकदा नक्की करून बघा

Shoking News : घातपात की आयुष्य संपवलं? बंद घरात सापडले ४ मृतदेह, मृत्यूचं कारण गुलदस्त्यात

SCROLL FOR NEXT