Ajit Pawar  Saam tv
मुंबई/पुणे

Ajit Pawar : PM मोदींनी शरद पवारांना भटकती आत्मा म्हटल्याने लोकसभेत फटका? अजित पवारांची कबुली, VIDEO

Vishal Gangurde

मुंबई : राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. अजित पवार यांनी महाराष्ट्रातील महायुतीच्या अपयशावर मोठं भाष्य केलं आहे. 'पंतप्रधान मोदींनी शरद पवारांना भटकती आत्मा म्हटल्याने लोकसभा निवडणुकीत फटका बसला, अशी कबुली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. साम टीव्हीला सूत्रांनी ही माहिती दिली आहे. अजित पवारांच्या कबुलीनंतर राजकीय वर्तुळानंतर चर्चांना उधाण आलं आहे.

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील ४८ जागांपैकी महाविकास आघाडीने ३० जागा जिंकल्या. सांगलीचे अपक्ष खासदार विशाल पाटील यांनीही काँग्रेसला समर्थन दिलं. तर महायुतीला १७ जागांवर समाधान मानावे लागले. मागील निवडणुकीच्या तुलनेत महायुतीला राज्यात मोठा फटका बसला. या लोकसभेच्या अपयशावरून अजित पवारांनी मोठं भाष्य केलं आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सभेवेळी शरद पवार यांच्यावर न बोलण्याची विनंती केली होती. त्यानंतर पुणे शहरातील मोदी यांच्या सभेवेळी शरद पवार यांच्यावर पंतप्रधान मोदींनी बोलू नये, अशी विनंती स्वत: केली होती. मात्र, नेमकं त्याचवेळी भटकती आत्मा म्हणून शरद पवारांचा उल्लेख केल्यामुळे फटका बसल्याची कबुली अजित पवारांनी दिली आहे.

जन सन्मान यात्रेदरम्यान अजित पवारांची मोठी खबरदारी

जन सन्मान यात्रा सुरू झाल्यापासून अजित पवार यांनी शरद पवारांचं नाव घेणं टाळलं आहे. मागील २ दिवसांच्या दौऱ्या अजित पवारांनी एकदाही शरद पवार आणि त्यांच्या पक्षावर टीका केली नाही. लोकसभेत शरद पवार आणि त्यांच्यावर केलेल्या टीकेचा फटका बसल्याने यंदा अजित पवारांकडून खबरदारी घेतल्याची माहिती मिळत आहे. आतापर्यंत दिंडोरी, देवळाली आणि येवला या तिन्ही मतदारसंघात फिरताना लोकसभेत फटका बसलेल्या कांदा प्रश्नावर अजित पवारांनी हात जोडून नाशिककरांच्या समोर माफीनामा मागितला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; तीन वाहने एकमेकांना धडकली, पाहा VIDEO

Sukanya Samruddhi Yojana: १० हजार १५ वर्षे भरा, २१ व्या वर्षी मुलीच्या खात्यात तब्बल ३८ लाख; जाणून घ्या सरकारची भन्नाट योजना

Maharashtra Politics : महायुतीच्या जागावाटपाचं घोडं कुठं अडलं? कोणत्या पक्षाला काय हवं?

Mumbai Metro News: मुंबईकरांसाठी गुड न्यूज! 'मेट्रो ३' आरे ते बीकेसी टप्पा लवकरच सुरु होणार; ऑक्टोंबरमध्ये PM मोदी करणार लोकार्पण

Maharashtra Politics : अमित शहा पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार; महायुतीत काहीतरी मोठं घडणार, नेमकं काय?

SCROLL FOR NEXT