Devendra Fadnavis Latest Marathi News, Maharashtra Floor Test News updates Saam Tv
मुंबई/पुणे

Devednra Fadnavis : "मी पुन्हा आलो आणि यांनाही घेऊन आलो"; फडणवीसांची फटकेबाजी

Devendra Fadnavis Latest News : "माझी टिंगल-टवाळी केली पण मी पुन्हा आलो आणि एकटा आलो नाही तर यांना घेऊन आलो" असा टोला फडणवीस यांनी लगावला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : आज, सोमवारी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सरकारनं राजकीय पटलावरची आपली दुसरी परीक्षाही पास केली आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी शिंदे सरकारने विश्वासदर्शक ठरावाची लढाई जिंकली आहे. यानंतर अभिनंदन प्रस्ताव मांडताना उप-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं अभिनंदन केलं. यावेळी फडणवीसांनी विरोधकांनाही चांगलचं धारेवर घेतलं. "माझी टिंगल-टवाळी केली पण मी पुन्हा आलो आणि एकटा आलो नाही तर यांना घेऊन आलो" असा टोला फडणवीस यांनी लगावला आहे. (Maharashtra Floor Test News updates)

हे देखील पाहा -

देवेंद्र फडणवीस सभागृहात म्हणाले की, मी तेव्हा कविता केली होती मी पुन्हा येईन... तेव्हा माझी टिंगल-टवाळी केली. पण मी पुन्हा आलो आणि एकटा आलो नाही तर यांनाही घेऊन आलो असं फडणवीस म्हणाले. तसेच मी आता या सर्वाचा बदला घेणार, हा बदला म्हणजे मी यांना माफ करणार असा टोलाही फडणवीसांनी महाविकास आघाडीला लगावला आहे. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीवस म्हणाले की, काही लोकांना असे वाटायचे आम्ही सत्तेसाठी करतो, सत्ता आमचे साधन आहे. मी म्हणालो होतो, जेव्हा सरकार जाईल तेव्हा आम्ही पर्यायी सरकार देऊ. आमची खंत होती, जनतेने आम्हाला बहुमत दिलं आणि काहींनी हिरावून नेऊ, जनतेने दिलेल्या बहुमताचा सन्मान आम्ही करून दाखवू. मला माझ्या नेत्यांनी आदेश दिला उपमुख्यमंत्री पदाचा असं फडणवीस म्हणाले. तसेच एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी मी पूर्णपणे उभा राहीन, त्यांच्यात आणि माझ्यात दुरावा दिसणार नाही आणि आमची मैत्री नेहमीच कायम राहील असंही फडणवीस म्हणाले आहे.(Devendra Fadnavis Latest Marathi News)

आपल्या भाषेच देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शरद पवार यांनी संघ आणि संघाची शिस्त याचा उल्लेख केला. मनसे नेते राज ठाकरे यांनी खूप सुंदर पत्र लिहीलं. मी त्यांचे फोन करून आभार मानले, मी त्यांची भेट घेणार आहे. काही लोक ओरडत होते ईडी-ईडी पण हे खरंच आहे ही ईडी म्हणजे देवेंद्र आणि एकनाथ शिंदे आहेत असा टोलाही त्यांनी लगावला आहे. यावेळी त्यांनी हनुमान चालीसा प्रकरणाबाबतही वक्तव्य केलं आहे. तसेच येत्या काळात हा नेता जनसामान्यांना उपलब्ध असेल, हा नेता एका कॉलवर उपलब्ध असेल असंही फडणवीस म्हणाले आहेत.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT