आरोग्य विभागाची 25, 26 सप्टेंबरला होणारी परीक्षा रद्द : राजेश टोपे
आरोग्य विभागाची 25, 26 सप्टेंबरला होणारी परीक्षा रद्द : राजेश टोपे Saam Tv
मुंबई/पुणे

आरोग्य विभागाची 25, 26 सप्टेंबरला होणारी परीक्षा रद्द : राजेश टोपे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : आरोग्य विभागाची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना अनेक तांत्रिक अडचणी येत आहेत. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने गट क आणि ड प्रवर्गामधील कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येत आहे. याकरिता आज शनिवार (ता. २५) आणि रविवार (ता. २६) लेखी परीक्षा आयोजित करण्यात आली होती.

मात्र, या परीक्षेकरिता उमेदवारांच्या प्रवेश पत्राबाबत प्रचंड गोंधळ होता. यामुळे ही परीक्षा रद्द करण्यात आली आहे. ती पुढे ढकलण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. याबाबत न्यासा नावाच्या कंपनीकडे राज्य सरकारने भरती प्रक्रियेचे काम दिले होते.

हे देखील पहा-

उमेदवारांच्या अडचणी

- परिक्षा ४ दिवसांवर असताना अभ्यासक्रमाची विद्यार्थ्यांना कल्पना नाही

- अनेकांचे प्रवेशपत्र आणखी मिळाले नाही

- प्रवेशपत्रावर फोटो, केंद्र आणि वेळ नाही

- २ पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना २ ठिकाणी एकाच दिवशी परिक्षा देणे अशक्य

- संकेतस्थळ अनेकदा हँग होत आहे

आरोग्य विभागातील पदे

१) गट क : रासायनिक सहायक, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, रक्तपेढी तंत्रज्ञ, आहार तज्ज्ञ, अधिपरीचारिका, वरिष्ठ तंत्रज्ञ, सुतार, वाहन चालक

२) गट ड : शिपाई, कक्षसेवक, बाह्यरुग्ण सेवक, अपघात विभाग सेवक, प्रयोगशाळा सेवक, रक्तपेढी परिचर, दंतसहाय्यक, पुरुष/स्त्री परिचर, अकुशल कारागीर, मदतनीस इ.

सार्वजनिक आरोग्य विभाग भरती २०२१ :

संवर्ग : पदांची संख्या : आलेले अर्ज

गट क : २७२५ : ४,०५,०००

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Special Report | नवनीत राणांचा ओवेसींवर पुन्हा हल्ला!

Raj Thackeray | राज ठाकरेंनी काढला फतवा!

Chhatrapati Sambhajinagar News | संभाजीनगरमध्ये ठाकरे गट आणि महायुतीत हायवोल्टेज राडा

Nashik Constituency | लोकसभेच्या रणधुमाळीत विधानसभेची तयारी?

Maharashtra Politics: दादांची दमबाजी, सुप्रियाताईंची ढाल; निलेश लंकेसाठी सुळेंनी घेतला अजित पवारांशी पंगा, VIDEO

SCROLL FOR NEXT