चिंता वाढली! डेल्टा प्लसचे ७६ रुग्ण, १८ वर्षाखालील ९ जणांचा समावेश Saam Tv
मुंबई/पुणे

चिंता वाढली! डेल्टा प्लसचे ७६ रुग्ण, १८ वर्षाखालील ९ जणांचा समावेश

राज्यामध्ये कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरियंटचे आणखी १० रुग्ण वाढले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुणे : राज्यामध्ये कोरोनाच्या corona डेल्टा प्लस Delta Plus व्हेरियंटचे आणखी १० रुग्ण वाढले आहे. आतापर्यंत ७६ रुग्णांची नोंद असल्याची माहिती आरोग्य खात्यामार्फत health department देण्यात आली आहे. कोरोना नियंत्रणाकरिता विषाणूचे जनुकीय क्रमनिर्धारण जिनोमिक सिक्वेंसिंग नियमित करण्यात येत आहे. जनुकीय क्रमनिर्धारण हे प्रयोगशालेय सर्वेक्षणाचा खूप महत्त्वाचा घटक मानला जात आहे.

सेंटीनल सर्वेक्षण राज्यामधील ५ प्रयोगशाळा Laboratory आणि ५ रुग्णालयांची निवड सेंटीनल सेंटर म्हणून करण्यात आली आहे. हे प्रत्येक सेंटीनल सेंटर प्रत्येक पंधरवड्याला १५ प्रयोगशालेय नमुने जनुकीय क्रमनिर्धारणासाठी राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था आणि राष्ट्रीय पेशी विज्ञान संस्था या संस्थांना पाठवण्यात येत आहेत.

हे देखील पहा-

महाराष्ट्र शासनाने जनुकीय क्रमनिर्धारण सर्वेक्षणास मोठ्या प्रमाणात गती मिळावली आहे. यासाठी कौन्सिल ऑफ सायंटिफिक ॲड इंडस्ट्रिअल रिसर्च संस्थेअंतर्गत काम करणाऱ्या इन्स्टिट्यूट ऑफ जिनोमिक्स ॲड इंटिग्रेटेड बायॉलॉजी या प्रयोगशाळेसोबत करार करण्यात आला आहे. या नेटवर्कद्वारे दर महिन्याला प्रत्येक जिल्ह्यामधून १०० नमुन्यांची तपासणी करण्यात येत आहे.

इन्स्टिट्यूट ऑफ जिनोमिक्स ॲड इंटिग्रेटेड बायॉलॉजी या प्रयोगशाळेने राज्यामध्ये आणखी १० डेल्टा प्लस रुग्णांचे निदान केले आहे. यापैकी ६ रुग्ण कोल्हापूर जिल्ह्यामधील, ३ रत्नागिरी जिल्ह्यामधील तर १ सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील आहे. हे १० रुग्ण कोरोना मधून बरे झाले आहेत. राज्यामध्ये आतापर्यंत आढळलेल्या डेल्टा प्लस रुग्णांची संख्या ७६ येऊन पोहचली आहे. या जनुकीय क्रमनिर्धारण तपासणी मधून राज्यात ८० टक्क्यांहून अधिक नमुन्यांमध्ये ‘डेल्टा’ व्हेरियंट आढळत असल्याचे दिसून येत आहे.

जिल्हानिहाय तपशील पुढीलप्रमाणे-

जिल्ह्यात डेल्टा प्लसचे रूग्ण

जळगाव - १३

रत्नागिरी - १५

मुंबई - ११

कोल्हापूर - ७

ठाणे, पुणे - प्रत्येकी ६

पालघर, रायगड - प्रत्येकी ३

नांदेड, गोंदिया, सिंधुदुर्ग - प्रत्येकी २

चंद्रपूर, अकोला, सांगली, नंदूरबार, औरंगाबाद, बीड - प्रत्येकी १

- वयोगट :

१८ वर्षांखालील रुग्णसंख्या : ९

१९ ते ४५ वर्षे गटामधील रुग्ण : ३९

४६ ते ६० वर्षे गटामधील रुग्णसंख्या : १९

६० पेक्षा जास्त वयोगटामधील रुग्ण : ९

डेल्टा प्लसच्या ७६ रुग्णांपैकी १० जणांचे २ कोरोना प्रतिबंधक लसीचे डोस झाले आहे, तर १२ जणांनी केवळ १ डोस घेतलेला आहे. लस घेतलेल्यांपैकी २ जणांना कोवॅक्सिन तर इतर सर्वांनी कोविशिल्ड लस घेतली आहे. आजाराचे स्वरूप या रुग्णांपैकी ३७ रुग्ण हे लक्षणेविरहित किंवा सौम्य लक्षणे असणारे आहेत. यामुळे रुग्णालयात भरती करण्याची आवश्यकता भासलेली नाही. ७६ रुग्णांपैकी ७१ रुग्ण कोरोना मधून बरे झाले आहेत. यामध्ये मृत्यू या ७६ रुग्णांपैकी ५ जणांचे मृत्यू झाले आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: ज्याला पाडायचे त्याला पाडा - मनोज जरांगे

Nashik Crime : अनैतिक संबंधाला अडथळा, मावसभावाने काढला भावाचा काटा, नाशिक हादरले!

Singham Again Vs Bhool Bhulaiyaa 3: रूह बाबा की सिंघम, बॉक्स ऑफिसवर कुणाची चलती?

Hemoglobin: हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी काय खावे? जाणून घ्या...

Mumbai News: गोरेगावमध्ये टेम्पोत मोठा स्फोट, एकाचा दुर्दैवी मृत्यू; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT